CoronaVirus : नांदुऱ्यात दोन डॉक्टर व अडत दुकानदार पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 12:44 IST2020-07-06T12:42:18+5:302020-07-06T12:44:07+5:30

आतापर्यंत या रुग्णांच्या संपर्कातील २० जणांचे स्वॅब घेतले आहेत.

CoronaVirus: Two doctors and a shopkeeper in Nandura tested positive | CoronaVirus : नांदुऱ्यात दोन डॉक्टर व अडत दुकानदार पॉझिटिव्ह

CoronaVirus : नांदुऱ्यात दोन डॉक्टर व अडत दुकानदार पॉझिटिव्ह

ठळक मुद्देसिनेमा रोडवरील एक डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला.एक डॉक्टर मुंबईमध्ये पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

नांदुरा : शहरात कोराना संसर्ग वाढत असुन कोराना संसर्ग झालेल्यांची संख्या २३ वर गेली आहे. दरम्यान, नांदुरा शहरातील सिनेमा रोडवरील एक डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला तर नांदुºयातील आणखी एक डॉक्टर मुंबईमध्ये पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
या व्यतिरिक्त नांदुºयातली एक अडत दुकानदारही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या तिघांच्या संपर्कात आलेल्यांचा सद्या शोध घेण्यात येत आहे. मुंबईत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णावर तेथेच उपचार करण्यात येत आहे. अडत दुकानदार नेमका कोणाच्या संपर्कात आला आहे हे अद्याप स्पष्ट नसले तरी यंत्रणा सध्या त्यादृष्टीने प्रयत्न करत आहे. आतापर्यंत या रुग्णांच्या संपर्कातील २० जणांचे स्वॅब घेतले आहेत.

 

Web Title: CoronaVirus: Two doctors and a shopkeeper in Nandura tested positive