Coronavirus in Buldhana: Patients on the threshold of two thousand | CoronaVirus in Buldhana : रुग्ण दोन हजाराच्या उंबरठ्यावर

CoronaVirus in Buldhana : रुग्ण दोन हजाराच्या उंबरठ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील कोराना बाधीतांची संख्या दोन हजारांच्या टप्प्यात आली असून रविवारी ६७ जण कोरोना बाधीत आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ही १,९०७ झाली आहे. दरम्यान गेल्या २४ दिवसात प्रतिदिन सरासरी ५२ रुग्ण रुग्ण जिल्ह्यात आढळून येत असून या २४ दिवसात जिल्ह्यात १,२३८ बाधीत रुग्ण आढळून आले.
परिणामी जुलै, आॅगस्ट महिन्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती जिल्ह्यात वाढली आहे. आतापर्यंत २०० पेक्षा अधिक प्रतिबंधीत क्षेत्रातील दोन लाख लोकसंख्येपैकी १३ हजार संदिग्ध रुग्णांचे स्वॅब आतापर्यंत तपासण्यात आले आहे.
दुसरीकडे प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले व रॅपीड टेस्टमध्ये तपासणी करण्यात आलेल्या ३९७ जणांच्या अहवालापैकी ३३० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ६७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चिखलीतील तीन, सातगाव म्हसला येथील दोन, मलकापूर येथील तीन, मोताळा येथील एक, गोतमारा दोन, लोणार चार, दहीफळ एक, बानापूर दोन, खळेगाव दोन, सुलतानपूर चार, नांदुरा चार, भालेगाव बाजार एक, जयपूर लांडे एक, खामगाव १९, देऊळगाव राजा तीन, बायगाव चार, मेहकर पाच, आडोळ एक, पळसकेड एक, बुलडाणा दोन, शेगाव दोन, सिंदखेड राजातील शेलू येथे एक जण पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, ३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यात मेहकरमधील दहा, डोणगाव दोन, घाटबोरी एक, खामगावात २१ आणि येळगाव येथील एका रुग्णास सुटी देण्यात आली आहे.
दुसरीकडे तपासणी करण्यात आलेल्या संदिग्ध १२,३२० रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहे तर बाधीत झालेल्या रुग्णांपैकी एक हजार १६० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या १७१ जणांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. रुग्णालयामध्ये सध्या ७१२ अ‍ॅक्टीवर रुग्णांवर उपचार करण्यात येत ्सून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ३५ असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली. दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत असून रुग्ण संख्या दोन हजाराच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे.

Web Title: Coronavirus in Buldhana: Patients on the threshold of two thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.