CoronaVirus in Buldhana : हाय रिस्क झोन मधील १६ हजार नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 11:13 IST2020-04-01T11:13:38+5:302020-04-01T11:13:44+5:30
हायरिस्क झोनमध्ये येणाऱ्या १६ हजार नागरिकांची तपासणी करण्यात येणार

CoronaVirus in Buldhana : हाय रिस्क झोन मधील १६ हजार नागरिकांची तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या घराला केंद्र बिंदून मानून त्याच्या परिघातील हायरिस्क झोनमध्ये येणाऱ्या १६ हजार नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. आर. एस. फारूखी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
दरम्यान, मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या ६६ व्यक्तींपैकी ३२ जणांचे स्वॅब नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी ज्यांचे स्वॅब नमुने निगेटीव्ह आले अशा २१ जणांना हॉस्पीटल क्वारंटीनमधून काढून होम क्वारंटीनमध्ये ठेवण्यात आले आहे. आगामी १४ दिवस त्यांच्यावर आरोग्य विभागाचा ‘वॉच’ राहणार असून त्यांच्यात जर कोरोना संक्रमणाची लक्षणे आढळून आली तर त्यांना थेट आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात येईल, असेही डॉ. फारूखी यांनी अधोरेखीत केले आहे. दरम्यान, ३१ मार्च रोजी दुपारी डॉ. फारूखी यांनी कोरोनाच्या दृष्टीने अति जोखमीचा मानला जाणारा ईशान्य दिशेच्या भागाची पाहणी करून स्थानिकांशी चर्चा करत आरोग्य विभागस तपाणीमध्ये सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.