CoronaVirus in Buldhana : रुग्ण वाढल्याने समूह संक्रमणाचा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 17:25 IST2020-04-06T17:23:53+5:302020-04-06T17:25:56+5:30
जिल्ह्यात कोरोनाचे समूह संक्रमण (कम्युनिटी स्प्रेड) होण्याचा धोक अधिक वाढला आहे.

CoronaVirus in Buldhana : रुग्ण वाढल्याने समूह संक्रमणाचा धोका!
बुलडाणा : सर्वत्र थैमान घालणाºया कोरोना विषाणूने बुलडाणा शहरापाठोपाठ आता जिल्ह्यातही हातपाय पसरण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा नऊवर पोहचला असल्याने बुलडाणा, खामगाव, चिखली व देऊळगाव राजासह इतर शहरातील नागरिकांमध्येही धास्ती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे समूह संक्रमण (कम्युनिटी स्प्रेड) होण्याचा धोक अधिक वाढला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या गेल्या आठवड्यापासून सातत्याने वाढत आहे. ४ एप्रिलपर्यंत कोरोना बाधीत रुग्ण केवळ बुलडाणा शहरातच होते; परंतू ५ एप्रिल रोजी जिल्ह्यातील चार रुग्ण कोरोना कोरोना पॉझिटिव्ह आढळले. चिखली, देऊळगाव राजा आणि खामगाव तालुक्यातील चितोडा याठिकाणीही कोरोना पोहचल्याने जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात कोरोनाचा शिरकाव होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे समूह संक्रमण (कम्युनिटी स्प्रेड) होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगानेच जिल्ह्यातील प्रत्येक शहरात आरोग्य विभागाने सर्व्हीलन्स (पाळत ठेवणे) सुरू केले आहे. ज्या भागात रुग्ण सापडले त्याठिकाणचा परिसर सील करण्यात आला आहे. चिखली शहरातील दोन रुग्ण पॉझीटीव्ह आल्याने शहरातील हायरिस्क झोन भाग सील करण्यात आला असून संपूर्ण शहरात सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात उपविभागीय अधिकाºयांनी तसा आदेशही काढला आहे. त्यामुळे आगामी काळात बुलडाणा जिल्ह्याची चिंता वाढली असून कोरोना संसर्गाचा विळखा बुलडाणा जिल्ह्यात पडत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील पोलीस यंत्रणाही अलर्ट झाली आहे.