CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचा मृत्यू; ८८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 11:10 AM2020-08-31T11:10:16+5:302020-08-31T11:15:46+5:30

रविवारी बुलडाणा तालुक्यातील जागदरी व चिखली तालुक्यातील जांभोरा येथील अनुक्रमे ६८ व ६५ वर्षीय व्यक्तींचा यात समावेश आहे.

CoronaVirus in Buldhana: Death of two more; 88 positive | CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचा मृत्यू; ८८ पॉझिटिव्ह

CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचा मृत्यू; ८८ पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा:  जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून 30 आॅगस्ट रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाला असून ८८ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी बुलडाणा तालुक्यातील जागदरी व चिखली तालुक्यातील जांभोरा येथील अनुक्रमे ६८ व ६५ वर्षीय व्यक्तींचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील एकूण बाधीत रुग्णांची संख्या ३, ०७१ वर पोहेचली आहे. रविवारी पुन्हा ८८ जण कोरोना बाधीत झाल्याचे तपासणीत समोर आले चार दिवसात मृत्यू पावलेल्यांमध्ये बुलडाण्यातील २५ वर्षीय महिलेचा अपवाद वगळता अन्य मृतक हे ६० पेक्षा अधिक वर्षाचे आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा चार, शेळगाव आटोळ दोन, अंत्री खेडेकर एक, भालगाव दोन, सोयगाव एक, धाड एक, चिखली १८, शेगाव पाच, जवळखेड १, बायगाव दोन, मेंगाव चार, नायगाव एक, पिंपळगाव काळे एक, शेंदुर्जन दोन, दुसरबीड एक, देऊळगाव कोळ एक, वाघाळा एक, सिंदखेड राजा १३, मलकापूर तीन, देऊळगाव राजा दोन, मेहकर एक, लोणार तीन, बरटाळा एक, वानखेड १, सोनाळा १, धामणगाव बढे एक, जळगाव जामोद एक, खामगावमधील १२ जणांचा यात समावेश आहे. आतापर्यंत कारोनामुक्त झालेल्या २,१२४ जणांना सुटी देण्यात आली आहे.


जिल्ह्यात आतापर्यंत ४८ जणांचा मृत्यू

गेल्या पाच महिन्यात जिल्ह्यात कोरोनामुळे ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात दररोज कोरोनामुळे किमान एका बाधीताचा मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे बाधीतांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचा कोरोनाचा मृत्यूदर सध्या १.५६ वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३० आॅगस्ट रोजी ६९.१६ टक्के आहे. दुसरीकडे रविवारी १८ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्ह्यात ८९९ बाधीतांवर उपचार होत आहेत.

 

Web Title: CoronaVirus in Buldhana: Death of two more; 88 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.