CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले १३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 11:09 AM2020-06-27T11:09:56+5:302020-06-27T11:10:07+5:30

१२ रुग्ण खामगाव, नांदुरा, शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील असून एक रुग्ण सुलतानपूर येथील आहे.

Coronavirus: 13 positive in Buldana district on the same day | CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले १३ पॉझिटिव्ह

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले १३ पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : दोन दिवसानंतर पुन्हा बुलडाणा जिल्ह्यात तब्बल १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यापैकी १२ रुग्ण खामगाव, नांदुरा, शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील असून एक रुग्ण सुलतानपूर येथील आहे. दरम्यान, यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या १८३ वर पोहोचली आहे.
तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी २८ अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. यापैकी १५ अहवाल निगेटीव्ह आले असून १३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये लोणार तालुक्यातील सुलतनापूर येथील ४२ वर्षीय महिला, मलकापूरमधील काळीपुरा भागातील वृद्ध व्यक्ती, संग्रामपुर तालुक्यातील बावनबीर येथील एक जण, शेगावातील शादीखाना येथील ६० वर्षीय पुरुष, तसेच याच तालुक्यातील आळसना येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा यात समावेश आहे. या व्यतिरिक्त खामगाातील २७ वर्षीय महिला, अकोला येथील रामदास पेठ मधून आलेला २० वर्षीय तरूण, आठ, व १२ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर नांदुरा येथील दहा आणि १२ आणि १३ वर्षीय मुलगी व एका २४ वर्षाच्या युवकाचा यात समावेश आहे. गेल्या काही दिवसापासून या व्यक्ती आयसोलेशनमध्येच होत्या. शुक्रवारी तीन कोरोनाबाधित व्यक्ती बऱ्या झाल्याने त्यांना वैद्यकीय संकेतानुसार रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये जळगाव जामोद येथील एक, मलकापूरमधील भीमनगरमध्ये राहणारा एक युवक व मलकापूर येथीलच ५८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. एकाच दिवशी कोरोनाचे १३ रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Coronavirus: 13 positive in Buldana district on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.