शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

CoronaVirus : मलकापूरात एकाच दिवशी ११ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 10:49 IST

तब्बल ११ रुग्ण हे एकट्या मलकापूर तालुक्यातील असून मलकापूर शहरातील नऊ कोरोना बाधीतांचा यात समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/मलकापूर : जिल्ह्यात सोमवारी एकाच दिवशी १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यातील तब्बल ११ रुग्ण हे एकट्या मलकापूर तालुक्यातील असून मलकापूर शहरातील नऊ कोरोना बाधीतांचा यात समावेश आहे.अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी १३२ अहवाल सोमवारी प्राप्त झाले. त्यापैकी १२० अहवाल निगेटीव्ह असून १२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान, पॉझिटिव्ह अहवालापैकी नऊ अहवाल हे एक्या मलकापूर शहरातील आहेत. यात मलकापूरातील भीमनगरात राहणाऱ्या १६ व २० वर्षीय तरुणी, नऊ वर्षाचा मुलगा आणि ३० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. पारपेठमधील ४३ आणि ५९ वर्षीय पुरुष तर हेडगेवारनगरमधील एका ३६ वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर हनुमान चौकातील आठ महिन्याच्या बाळासह २७ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. धोंगर्डी येथील ७० वर्षीय महिला व ६२ वर्षाच्या व्यक्तींही कोरोना संक्रमीत असल्याचे अहवालावरून स्पष्ट होत आहे. दुसरीकडे लोणार तालुक्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढत असून ब्राम्हण चिकना येथे आणखी एक व्यक्ती पॉझिटिव्ह सापडला. सोमवारी एकूण १२ व्यक्ती बाधीत असल्याचे अहवाल समोर आले.त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे कोवीड रुग्णालयात उपचार घेवून बरे झालेल्या चार रुग्णांना सुटी देण्यात आली. यात शेलापूर येथील दोघे, बुलडाण्यातील मच्छी ले आऊटमधील व्यक्ती आणि मलकापूरमधील भीमनगरमधील २५ वर्षीय युवकाचा समावेश आहे. आतापर्यंत कोरोना बाधीत रुग्णांपैकी ८१ रुग्ण बरे झाले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात रुग्णालयामध्ये ४४ व्यक्तींवर उपचार करण्यात येत आहे.आजपर्यंत १,८७२ अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत तर एकूण कोरोना बाधीतांची संख्या १३० वर पोहोचली आहे. पैकी पाच जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.सध्या १८ अहवालांची प्रतीक्षा असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली.

आठ महिन्याचे बालकही कोरोना बाधीतमलकापूर शहरातील हनुमान चौक या प्रतिबंधीत क्षेत्रातील अवघ्या आठ महिन्याच्या बालकालाही कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. या मुलाचे वडील कोरोना बाधीत आढळून आले होते. त्यानंतर महिला व तिचे हे आठ महिन्याचे चिमुकले बाळ बाधीत निघाले.हेडगेवार मलकापूर तालुक्यातील १४ वे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून समोर येत आहे. ‘त्या’ डॉक्टरच्या संपर्कातील व्यक्ती बाधीत झाला. त्याच्याकडून हेडगेवार नगरमधील व्यक्ती बाधीत झाला असल्याने बाधिताची आई, वडील व पत्नी यांना क्वारंटीन करणतत आले.संक्रमण रोखण्यासाठी प्रयत्नबुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक सॅम्पलींग हे मलकापूर तालुक्यात झाल्याचा अंदाज आहे. संदिग्ध सर्वच रुग्ण इंस्टीट्युशनल क्वारंटीन करण्यात येऊन चेन ब्रेक करण्यात येतेय.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMalkapurमलकापूरbuldhanaबुलडाणा