शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

CoronaVirus in Buldhana : तिघांचा मृत्यू, १२९ कोरोनाबाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 13:07 IST

१२९ जण तपासणीत कोराना बाधीत आढळून आले तर तीन जणांचा कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा:  गेले चार ते पाच दिवस कोरोना बाधीत रुग्ण तुलनेने कमी आढळून येत असताना गुरूवारी पुन्हा १२९ जण तपासणीत कोराना बाधीत आढळून आले तर तीन जणांचा कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू झाला. परिणामी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची जिल्ह्यातील एकूण संख्या १२५ झाली आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट केलेल्यांपैकी १,३६४ जणांचे अहवाल गुरूवारी प्राप्त झाले. त्यापैकी १२९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर १,२३५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. दुसरीकडे उपचारादरम्यान खामगाव येथील कोवीड रुग्णालयामध्ये जळगाव जामोदमधील ८३ वर्षीय व्यक्ती, बुलडाणा कोवीड रुग्णालय मलकापूरमधील शास्त्रीनगरमधील ८२ वर्षीय महिला तर सव येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला.दरम्यान, गुरूवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये जळगांव जामोद येथील चार, खेर्डा येथील एक, वाडी खुर्द येथील एक, खामगाव सहा, घाटपुरी एक, निमकवळा सहा, वझर नऊ, झोडगा तीन, शिरला चार, पिंप्री देशमुख पाच, बुलडाणा १२, चौथा एक, चांडोळ एक, पळसखेड दहा, सुलतानपूर दोन, वझर आघाव एक, जांभूळ एक, लोणार १३, मेहकर दोन, धानोरा एक, लोणी काळे एक, देऊळगाव साकर्शा एक, लोणी गवळी दोन, देऊळगाव माळी दोन, गोहेगाव तीन, हिवरा आश्रम एक, दादुल गव्हाण पाच, रायपूर एक, मुरादपूर एक, शेलसूर एक, चिखली सहा, सिंदखेड चार, मलकापूर एक, वाकोडी एक, भोटा दोन, देऊळगाव राजा सहा, सिनगाव जहाँगीर एक, सावखेड एक, असोला एक आणि जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील चार व्यक्ती या प्रमाणे १२९ जण कोरोना बाधीत आढळून आले. दरम्यान, ७८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ही वाढले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या