शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
7
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
8
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
9
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
10
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
11
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
12
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
13
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
14
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
15
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
16
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
17
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
18
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
19
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
20
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी

Corona Vaccination: सावळा गोंधळ! बुलडाण्याच्या मृत महिलेला तामिळनाडूत लस; कोविन सर्टिफिकिटही मिळाले 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 9:47 AM

Corona Vaccination Fraud: एप्रिलमध्ये निधन, ऑक्टोबरमध्ये लसीकरणाचा मेसेज. परिवारातील कोणीच तमिळनाडू पाहिलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : शहरातील एका मृत महिलेला तमिळनाडूत कोविड लस दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या मृत महिलेला लस दिल्याचे सर्टिफिकेटदेखील डाउनलोड झाले आहे. या प्रकारामुळे मृत महिलेचे नातेवाईक गोंधळून गेले आहेत.

सखूबाई गोपाळ बरडे (७५) यांचे १७ एप्रिल रोजी निधन झाले. शहरातील आढाव गल्लीत राहणाऱ्या या कुटुंबात मृत महिलेचे पती गोपाळराव, मुलगा राजेश व परिवार आहे. दरम्यान, राजेश बरडे यांच्या मोबाइलवर मंगळवारी, २ नोव्हेंबर रोजी एक मेसेज आला. सखूबाई बरडे यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्याचा तो संदेश होता. सखूबाई यांचा मुलगा राजेश याने मेसेजमधील लिंकवर जाऊन सर्टिफिकेट डाऊनलोड केले असता,  तमिळनाडू राज्यातील सर्टिफिकेट आले.

तमिळनाडू राज्यातील येन्नमंगलम् पीएचसी, यरोडे येथील लसीकरण केंद्रावर सखूबाईंचे २६ ऑक्टोबर २०२१ रोजी लसीकरण झाल्याचा त्यात उल्लेख आहे. तमिळ आणि इंग्रजीत असलेले हे सर्टिफिकेट बघून सखूबाई यांच्या नातेवाइकांना धक्का बसला. महाराष्ट्रात निधन झालेल्या महिलेचे नाव तमिळनाडूत कसे गेले, त्यांना तेथे लस दिली गेली, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या प्रकरणाने शतकोटी लसीकरण पूर्ण करणाऱ्या भारतातील लसीकरणाचा गोंधळ निदर्शनास येतो.

तमिळनाडू कधीच पाहिले नाहीमाझ्या आईचं निधन होऊन जवळपास सात महिने झाले. मी किंवा माझ्या परिवारातील कोणीच तमिळनाडू पाहिलेला नाही. असे असताना तिथं माझ्या मृत आईच्या नावाची नोंद होते. लसीकरण होते, त्यावर आधार कार्ड नंबर दिला जातो. लसीकरण झाल्याचा मेसेज मात्र महाराष्ट्रातील माझ्या नंबरवर येतो, हा प्रकार डोके चक्रावून टाकणारा असल्याची प्रतिक्रिया राजेश बरडे यांनी दिली.

नेमका प्रकार काय? : या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा राजेश बरडे यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. जे. सांगळे यांच्याशी संपर्क साधला असता तूर्तास आपण बोलू शकत नाही, असा मेसेज त्यांनी पाठवला. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस