शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

Corona Vaccination : १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांमध्ये लसीबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 10:50 AM

Corona Vaccination: लस केव्हा मिळणार याबाबत कुठलीही माहिती मिळत नसल्याने नोंदणी केलेले नागरिक संभ्रमात आहेत.

- विवेक चांदूरकर    लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस मिळणार असल्याचे शासनाने जाहीर केल्यावर २८ एप्रिल पासूनच हजारोंनी  कोविन वेबसाईडवर नोंदणी केली. मात्र, लस केव्हा मिळणार याबाबत कुठलीही माहिती मिळत नसल्याने नोंदणी केलेले नागरिक संभ्रमात आहेत. जिल्ह्यातील ९५ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे.  सध्या कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, सर्वांचीच लस घेण्यासाठी धडपड सुरू आहे. शासनाने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देणार असून, त्याकरिता २८ एप्रिलपासून ऑनलाईन नोंदणी करण्याचे जाहीर केले. त्यानुसार २८ एप्रिलपासून दररोज हजारो नागरिक ऑनलाईन नोंदणी करीत आहेत. ऑनलाईन नोंदणी होत आहे. मात्र, नोंदणी केल्यानंतर लस केव्हा मिळणार याबाबत कोणतीही माहिती मिळत नाही. त्यामुळे नागरिक संभ्रमात पडले आहेत. २८ एप्रिलला नोंदणी केल्यानंतर दहा दिवस झाले तरी अनेकांना लस मिळाली नाही. नोंदणी केलेले अनेक नागरिक रूग्णालयात जात आहेत. मात्र, लसीचा साठा कमी असल्याने लस मिळत  नाही. तसेच केव्हा मिळेल, याबाबतही सांगण्यात येत नाही. त्यामुळे त्यांना लस न घेताच परत यावे लागत आहे.   

३० टक्के लस दुसरा डोस घेणाऱ्यांना लसीकरण केंद्रावर लस देण्याबाबत नियोजन केले असून उपलब्ध असलेल्या लसीपैकी ३० टक्के लस दुसरा डोस घेणाऱ्यांना देण्यात येते. उर्वरित पहिला डोस घेणाऱ्यांना देण्यात येते. यामध्ये नोंदणी केली असलेल्या व नसलेल्या १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात येते. ज्यांनी नोंदणी केली नाही, त्यांची लसीकरण केंद्रावर नोंदणी होते.

अ‍ॅपबाबत राज्य शासनाकडे आरोग्य विभागाची तक्रार कोविन ऑनलाईन अ‍ॅपवर लस केव्हा मिळणार याबाबत माहिती मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नोंदणी केल्यावर लसीकरणाची तारीख दाखविण्यात येत नाही. याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने राज्य शासनाकडे तक्रार दिली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी सांगितले. लाईनमध्ये उभे असलेल्यांना लस देण्यात येते. लाईनमध्ये असलेल्या नागरिकाने ऑनलाईन नोंदणी केली नसेल तर त्याची तत्काळ नोंदणी करण्यात येते. त्यानंतर लस दिल्या जाते. लसीचा तुटवडा आहे. तो सर्वत्रच आहे. - डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प., बुलडाणा

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkhamgaonखामगाव