जिल्हा परिषद शाळा बोराखेडीच्यावतीने कोरोना लसीकरण जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:36 IST2021-03-27T04:36:25+5:302021-03-27T04:36:25+5:30

आराेग्य विभागाने ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी ...

Corona Vaccination Awareness on behalf of Zilla Parishad School Borakhedi | जिल्हा परिषद शाळा बोराखेडीच्यावतीने कोरोना लसीकरण जनजागृती

जिल्हा परिषद शाळा बोराखेडीच्यावतीने कोरोना लसीकरण जनजागृती

आराेग्य विभागाने ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी शिक्षक व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत तालुक्यातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन जनजागृती करण्यासाठी २१ मार्च रोजी तहसीलदार गटशिक्षण अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत. यासाठी चार-चार शिक्षकांची चहू तयार करण्यात आली असून, त्यांनी कोरोना जनजागृती व डाटा एंट्रीचे काम सुरू केले आहे. बोराखेडी मुख्याध्यापक अनिल चव्हाण व तेथील शिक्षकांनी बोराखेडी गावात घरोघरी जाऊन नागरिकांना लसीकरण हे महत्त्वाचे असून, यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, असे प्रबोधन करीत लसीकरणासाठी प्रवृत्त केले आहे. लसीकरण करून घेण्याचे काम सुरू आहे. जनजागृतीसाठी अनुप्रिता व्याळेकर, सुनीता हुडेकर, वामिंद्रा गजभिये, सीमा गोरे, अंगणवाडी सेविका उज्ज्वला चहाकर व अनिता धोरण यांनी सहकार्य केले.

Web Title: Corona Vaccination Awareness on behalf of Zilla Parishad School Borakhedi