नांदुऱ्यातील कोरोना संदिग्ध व्यक्ती उपचारार्थ भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 19:47 IST2020-04-03T19:46:53+5:302020-04-03T19:47:07+5:30
नांदुºयातील कोरोना संदिग्ध व्यक्ती उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.

नांदुऱ्यातील कोरोना संदिग्ध व्यक्ती उपचारार्थ भरती
न ांदुरा: जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच नांदुरा शहरातील एका कोरोना संदिग्ध व्यक्तीस खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. तर त्याच्या कुटूंबातील सहा लोकांना घरीच क्वारंटीन करण्यात आले आहे. खामगाव येथे उपचार घेत असलेला व्यक्ती नांदुरा शहरालगत असलेल्या खैवाडी भागातील रहिवाशी आहे. हा व्यक्ती नागपूर येथून मदरशातून आला आहे. त्याने नांदुरा शहरातील पाच ते सहा डॉक्टरांकडे त्याने आतापर्यंत उपचार घेतला आहे. मात्र त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. अशाप्रकारची व्यक्ती शहरात फिरत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. यावरून पोलिसांच्या मदतीने महसूल यंत्रणेने त्यास ताब्यात घेवून पुढील उपचारासाठी खामगाव सामान्य रुग्णालयात भरती केले. त्याच्या कुटूंबातील ६ लोकांनाही घरातच क्वारंटीन करण्यात आले आहे. डॉक्टरांनाही केले क्वारंटीनया व्यक्तीने नांदुरा शहरातील पाच ते सहा डॉक्टरांकडे उपचार घेतले आहेत. या संबधित डॅक्टरांनाही घरातच क्वारंटीन करण्यात आले आहे. सदर व्यक्तीचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले असून प्रतिक्षेत असल्याची माहिती तहसिलदार राहूल तायडे यांनी ‘लोकमत’ला दिली. नांदुरा शहरातील नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)