कोरोनामुळे लग्नांच्या अहेर प्रथेला पूर्णविराम - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:33 IST2021-05-01T04:33:14+5:302021-05-01T04:33:14+5:30
सध्या लग्न सोहळ्यात सामान्य कुटुंब असले तरी किमान २५ ते ५० हजार रुपयांच्या भेटवस्तू सहज येतात. एवढेच नव्हेतर, पैशाच्या ...

कोरोनामुळे लग्नांच्या अहेर प्रथेला पूर्णविराम - A
सध्या लग्न सोहळ्यात सामान्य कुटुंब असले तरी किमान २५ ते ५० हजार रुपयांच्या भेटवस्तू सहज येतात. एवढेच नव्हेतर, पैशाच्या स्वरूपातही भेट दिली जाते. त्यामुळे वर-वधू यांना संसार मांडण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. मात्र लग्न सोहळ्यात किमान २५ लोकांची उपस्थिती व २ तासांत लग्न सोहळा पार पाडण्याचे बंधन असल्याने वर-वधू पक्षांकडील नातलग व इतर मंडळी लग्न सोहळ्याकडे पाठ फिरवीत आहेत. अनेकजण सोशल मीडियावरून वर-वधूला शुभेच्छा आशीर्वाद देत आहेत. काही जणांनी लॉकडाऊनच्या काळात लग्न सोहळा न करता दिवाळीत करण्याचा निश्चय केला आहे.
लॉकडाऊन असल्याने कोणतेही सामान खरेदी करण्यासाठी दुकाने उपलब्ध नाहीत, त्यामुळे भेटवस्तू देणाऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. लग्नात भेट वस्तू देण्याच्या या प्रथेला कोरोनामुळे दुसऱ्या वर्षीही लगाम लागला आहे. नाहीतर लग्न सोहळ्यात हमखास फ्रीज, टीव्ही, कूलर, कपाट, दिवाण यासोबतच इतर किरकोळ वस्तूंची आरास लग्नमंडपात दिसून येत होती; मात्र कोरोना संकटाने लग्न सोहळ्यातून होणाऱ्या वारेमाप खर्चाची बचत झाली आहे. लॉकडाऊन कालावधीत झालेल्या लग्न सोहळ्यात बक्षीस पडले नसल्याने वर-वधू थोडे नाराज झाल्याचे चित्र आहे. लग्न सोहळ्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्री करणारे दुकानदार यांच्या व्यवसायावर अवकळा आली आहे.