कोरोनामुळे एकाचा मृत्यू, ४० जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:23 IST2021-06-23T04:23:13+5:302021-06-23T04:23:13+5:30

पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलडाणा तालुक्यातील आठ, खामगाव तीन, शेगाव दोन, देऊळगाव राजा पाच, चिखली पाच, मेहकर चार, मलकापूर तीन, ...

Corona kills one, 40 positive | कोरोनामुळे एकाचा मृत्यू, ४० जण पॉझिटिव्ह

कोरोनामुळे एकाचा मृत्यू, ४० जण पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलडाणा तालुक्यातील आठ, खामगाव तीन, शेगाव दोन, देऊळगाव राजा पाच, चिखली पाच, मेहकर चार, मलकापूर तीन, नांदुरा तीन, लोणार तीन, जळगाव जामोद तीन, सिंदखेड राजा तालुक्यातील एकाचा यात समावेश आहे. मोताळा आणि संग्रामपूर तालुक्यात मंगळवारी तपासणी एकही जण कोरोना बाधित आढळून आला नाही. उपचारादरम्यान लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील ४८ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मंगळवारी ४९ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यासोबतच आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ५ लाख ५२ हजार ९६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण बाधितांपैकी ८५ हार ५७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

--९९७ अहवालांची प्रतीक्षा--

अद्यापही ९९७ संदिग्धांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ८६ हजार ३३३ झाली असून त्यापैकी १०० सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ६५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.

Web Title: Corona kills one, 40 positive