कोरोनामुळे बुलडाणा जिल्ह्यात चौघांचा मृत्यू, ६५४ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 11:05 IST2021-05-12T11:05:04+5:302021-05-12T11:05:10+5:30
Corona Cases in Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला असून ६५४ जण तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले.

कोरोनामुळे बुलडाणा जिल्ह्यात चौघांचा मृत्यू, ६५४ पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनामुळे मंगळवारी बुलडाणा जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला असून ६५४ जण तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले. एकूण ४,५९० जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३,९३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील ७६, खामगाव १४८, शेगाव १३, देऊळगाव राजा ७१, चिखलीमधील १०४, मेहकरमधील ७, मलकापूरमधील ३०, नांदुऱ्यातील १७, लोणार तालुक्यातील १०५, मोताळ्यातील ३८, जळगाव जामोद मधील १३, सिंदखेड राजामधील २१, संग्रामपुर तालुक्यातील ११ जणांचा समोश आहे. उपचारादरम्यान कोरोनामुळे मंगळवारी चार जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये कंझारा येथील ५५ वर्षीय महिला, खामगावातील जलंब नाका येथील पुरुष, सुनगाव येथील ६० वर्षीय पुरुष, धाड येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.