शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात कोरोना नियंत्रणाात; बारा तालुक्यात एकही रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 11:10 IST

Corona control in buldhana : सध्या केवळ २३ सक्रिय रुग्ण असल्याचे एकंदरीत चित्र आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मे-जून महिन्यात महत्तम पातळीवर गेलेले कोरोनाचे संक्रमण आता जिल्ह्यात नियंत्रणात आले असून २८ जुलै रोजी तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांच्या २ हजार ५०५ अहवालांपैकी फक्त एकच अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यातच जिल्ह्यात सध्या केवळ २३ सक्रिय रुग्ण असल्याचे एकंदरीत चित्र आहे. त्यामुळे बुधवारचा पॉझिटिव्हिटी रेट अवघा ०.०४ टक्के होता.एक प्रकारे कोरोना मुक्तीच्या दिशेने जिल्ह्याची ही वाटचाल असल्याचे संकेत मिळत आहे. दरम्यान कोरोना बाधितांची संख्या जुलै महिन्याच्या अखेरीस निच्चांकी पातळीवर आल्याने आरोग्य यंत्रणेसाठीही ही बाब हुरूप वाढविणारी आहे. दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये चिखली शहरातील डीपी रोडवरील एका व्यक्तीचा समावेश आहे. दरम्यान, आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ६ लाख ३३ हजार ७६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच ८६ हजार ५५२ कोरोनाबाधितांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे. अद्यापही १ हजार ५०४ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ८७ हजार २४७ झाली आहे. यापैकी २३ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात ६७२ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट हा १२ टक्क्यांच्या आसपास स्थिरावला आहे. येत्या काळात त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या