Corona Cases in Buldhana : शनिवारी तिघांचा मृत्यू; ४५ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 12:17 IST2021-06-13T12:17:33+5:302021-06-13T12:17:38+5:30

  Corona Cases in Buldhana : जिल्ह्यात ३ जणांचा मृत्यू झाला, तर तपासणीमध्ये ४५ जण कोरोनाबाधित आढळून आले.

Corona Cases in Buldhana: Three killed on Saturday; 45 positive |   Corona Cases in Buldhana : शनिवारी तिघांचा मृत्यू; ४५ जण पॉझिटिव्ह

  Corona Cases in Buldhana : शनिवारी तिघांचा मृत्यू; ४५ जण पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनामुळे शनिवारी जिल्ह्यात ३ जणांचा मृत्यू झाला, तर तपासणीमध्ये ४५ जण कोरोनाबाधित आढळून आले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ३ हजार ९८० जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३ हजार ०३५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील २४, शेगाव दोन, देऊळगाव राजा एक, चिखली दोन, मेहकर तीन, मलकापूर दोन, नांदुरा दोन, लोणार एक, मोताळा पाच, जळगाव जामोद दोन, संग्रामपूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. खामगाव आणि सिंदखेड राजा तालुक्यात शनिवारी तपासणीत एकही बाधित आढळून आला नाही. उपचारादरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील वाडेगाव येथील ३५ वर्षीय महिला, चिखली येथील ३५ वर्षीय व्यक्ती आणि जळगाव खान्देशमधील जामनेर तालुक्यातील ४५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. दुसरीकडे ८१ जणांनी शनिवारी कोरोनावर मात केली. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्यांपैकी ५ लाख २६ हजार ८१ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर ८४ हजार ९१२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
 

Web Title: Corona Cases in Buldhana: Three killed on Saturday; 45 positive