Corona cases in Buldhana: आणखी पाच जणांचा मृत्यू; १,१४३ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 10:59 IST2021-05-13T10:58:58+5:302021-05-13T10:59:07+5:30
Corona cases in Buldhana: बुधवारी जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू झाला असून १,१४३ जण पॉझिटिव्ह आले.

Corona cases in Buldhana: आणखी पाच जणांचा मृत्यू; १,१४३ पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनामुळे बुधवारी जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू झाला असून १,१४३ जण पॉझिटिव्ह आले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲंटिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५,६८२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४,५३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील ११४, खामगाव मधील ११४, शेगाव मधील ७४, देऊळगाव राजा मधील ८२, चिखली मधील ७९, मेहकर मधील ९८, मलकापूर मधील ४७, नांदुरा तालुक्यातील १३७, लोणार मधील ११०, मोताळ्या मधील ६२, जळगाव जामोद मधील ८१, सिंदखेड राजा मधील ९१, संग्रामपूर मधील ५१ जणांचा समावेश आहे. उपचारादरम्यान खामगावातील सुटाळा बु. येथील ६५ वर्षीय महिला, बोथाकाजी येथील ५६ वर्षीय महिला, मेहकर तालुक्यातील भालखेड येथील ६४ वर्षीय पुरुष, जळगाव जामोद मधील ८० वर्षीय पुरुष व ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान ४५६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर आजपर्यंत ६८ हजार ६२६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ३ लाख ९४ हजार ६५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे,असे आवाहन करण्यात आले.