Corona Cases in Buldhana : एकाचा मृत्यू, ८४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 11:18 IST2021-06-28T11:18:07+5:302021-06-28T11:18:39+5:30

Corona Cases in Buldhana: एकाचा मृत्यू झाला असून ८४ जण तपासणीमध्ये कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

Corona Cases in Buldhana: Death of one, 84 positive | Corona Cases in Buldhana : एकाचा मृत्यू, ८४ पॉझिटिव्ह

Corona Cases in Buldhana : एकाचा मृत्यू, ८४ पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनामुळे जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला असून ८४ जण तपासणीमध्ये कोरोनाबाधित आढळून आले आहेत.  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण २ हजार ७५० जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार ६६६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये  बुलडाणा तालुक्यातील चार, शेगाव तीन, देऊळगाव राजा १०, चिखली तीन, मेहकर आठ, नांदुरा एक, लोणार ४९, मोताळा तीन, जळगाव जामोद तालुक्यातील तिघांचा समोश आहे. दरम्यान खामगाव, मलकापूर, सिंदखेड राजा आणि संग्रामपूर तालुक्यातील एकही संदिग्ध तपासणीमध्ये बाधित आढळून आला नाही. बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालयामध्ये शिवशंकरनगरमधील ७७ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान ५० जणांनी रविवारी कोरोनावर मात केली. एकूण बाधितांपैकी ८५ हजार ८१७ जणांनी कोरोनावर आजपर्यंत मात केली आहे. अद्यापही १२१२ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ८६५९९ असून १२२ सक्रिय रुग्ण आहे.

Web Title: Corona Cases in Buldhana: Death of one, 84 positive