Corona Cases in Buldhana : एकाचा मृत्य; ७३ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 11:35 IST2021-06-24T11:35:06+5:302021-06-24T11:35:12+5:30

Corona Cases in Buldhana : एकाचा मृत्यू झाला असून ७३ जण तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

Corona Cases in Buldhana: Death of One; 73 positive | Corona Cases in Buldhana : एकाचा मृत्य; ७३ जण पॉझिटिव्ह

Corona Cases in Buldhana : एकाचा मृत्य; ७३ जण पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनामुळे जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला असून ७३ जण तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण २ हजार ८६८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार ७९५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील १०, खामगाव नऊ, शेगाव चार, देऊळगाव राजा ११, चिखली ९, मेहकर आठ, मलकापूर तीन, लोणार ११, जळगाव जामोद चार, सिंदखेड राजा दोन आणि संग्रामपूर तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे. नांदुरा व मोताळा तालुक्यातील संदिग्धांपैकी एकही जण तपासणीमध्ये कोरोना बाधित आढळून आला नाही. दुसरीकडे कोरोनामुळे मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी येथील ५५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.दरम्यान ५४ जणांनी बुधवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ५ लाख ५४ हजार ८९१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सोबतच ८५ हजार ६३२ बाधितांनी आतापर्यंत कोरानावर मात केली आहे.

Web Title: Corona Cases in Buldhana: Death of One; 73 positive