कोरोना : आणखी २५ जण पॉझिटिव्ह; ३३ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:27 IST2020-12-26T04:27:26+5:302020-12-26T04:27:26+5:30
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये शेगाव दोन, खामगाव दोन, देऊळगावराजा पाच, चिखली एक, नायगाव बुद्रुक दोन, तांदुळवाडी एक, नांदुरा तीन, पळसखेड ...

कोरोना : आणखी २५ जण पॉझिटिव्ह; ३३ जणांची कोरोनावर मात
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये शेगाव दोन, खामगाव दोन, देऊळगावराजा पाच, चिखली एक, नायगाव बुद्रुक दोन, तांदुळवाडी एक, नांदुरा तीन, पळसखेड दोन, चिंचोली बुद्रुक एक, जळगाव जामोद एक, खामगाव तीन, पळसखेड झाल्टा एक आणि जालना जिल्ह्यातील वालसावंगी येथील एकाचा समावेश आहे. दरम्यान ३३ जणांनी कोरोनावर मात केली. त्यात बुलडाणा कोवीड सेंटरमधून एक, जळगाव जामोदमधून आठ, शेगाव तीन, सि. राजा दोन, देऊळगावराजा आठ, खामगाव सहा, चिखली दोन आणि मोताळा कोविड केअर सेंटरमधील तीन जणांचा समावेश आहे.
तपासणी करण्यात आलेल्यांपैकी आतापर्यंत ८६ हजार १६६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर ११ हजार ८४९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. अद्यापही १,२६४ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार ३३४ झाली आहे. रुग्णालयात ३३७ सक्रीय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १४८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे.