शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

जिगाव प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी अविरत संघर्ष - संचेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:48 AM

सिंचनासाठी आवश्यक असलेला जिगाव प्रकल्प लवकर पूर्ण करून प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन व त्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी मागील दहा वर्षांपासून नव्हे दशकापासून संघर्ष सुरू आहे. जोपर्यंत जिगाव प्रकल्पातील पाणी शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचत नाही  तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी दिली. 

ठळक मुद्देजिगावसह लघू प्रकल्पाच्या कामास प्रारंभ मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री गडकरी उपस्थित 

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: सिंचनासाठी आवश्यक असलेला जिगाव प्रकल्प लवकर पूर्ण करून प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन व त्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी मागील दहा वर्षांपासून नव्हे दशकापासून संघर्ष सुरू आहे. जोपर्यंत जिगाव प्रकल्पातील पाणी शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचत नाही  तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी दिली. आमदार चैनसुख संचेती हे रविवारी  १७ डिसेंबरला स्थानिक कोठारी विद्यालयाच्या  बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या प्रारंभ कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षा खडसे, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार अँड. आकाश फुंडकर, आमदार शशिकांत खेडेकर, आमदार संजय रायमुलकर, जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे, नगराध्यक्षा रजनी जवरे, मेहकर विधानसभा भाजपा नेते प्रा. प्रकाश गवई, जिल्हा परिषद सभापती श्‍वेता महाले, पंचायत समिती सभापती अर्चना पाटील,  राहुल संचेती (भाजप अध्यक्ष), मलकापूर, सुधिर मुर्‍हेकर (शहर अध्यक्ष भाजपा), धृपतराव सावळे (जिल्हाध्यक्ष भाजपा) आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे स्मृतिचिन्ह व पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक़्रमाचे प्रास्ताविक  आय.एस. चहल (प्रधान सचिव जलसंपदा) यांनी केले तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे ढगे यांनी प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाची माहिती दिली. आमदार चैनसुख संचेती यांनी त्यांच्या मार्गदर्शनात रखडलेल्या जिगाव प्रकल्पाचे काम व त्याकरिता केलेला संघर्ष याची माहिती देऊन जिगाव प्रकल्पाला रेल्वे उड्डाणपूल तसेच नांदुरा बायपास आदी विकास कामांसाठी निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री गडकरी यांचे आभार मानले. पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी कर्जमाफी योजनेचा पैसा शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होत असून, जिल्हय़ात सर्वात जास्त मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग झाल्याचे सांगितले.सभेला मोठय़ा प्रमाणात गर्दी झाल्याने कोठारी विद्यालयाचे प्रांगण गर्दीने फुलले होते तर मैदान पूर्ण भरल्याने अनेकांनी मैदान बाहेर उभे राहून प्रमुख नेत्यांचे भाषण ऐकले. कार्यक्रमाचे संचालन महेश पांडे तर आभारप्रदर्शन पाटबंधारे विभागाचे अभियंता सुर्वे यांनी केले.

जिगाव पूर्ण करा, शेवटचे मागणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या भाषणात मलकापूर मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती हे प्रत्येक वेळी माझ्या जिल्हय़ासाठी जिगाव प्रकल्पाला मोठा निधी देऊन तो जलदगतीने पूर्ण करा हे माझे शेवटचे मागणे असल्याचे वारंवार सांगत होते. चैनुभाऊ पाहा आता मोठा निधी तुमच्या प्रकल्पाला दिला आहे. हे सांगून आमदार संचेती यांनी या प्रकल्पासाठी करीत असलेल्या संघर्षाची माहिती दिली. - 

टॅग्स :buldhanaबुलडाणाChainsukh Sanchetiचैनसुख संचेती