संत रविदासांचे कार्य सतत प्रेरणादायी - आर. बी. रोझोदकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 16:17 IST2018-10-07T16:16:40+5:302018-10-07T16:17:41+5:30
संत रविदासांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात समाजातील दुर्बल घटकांमध्ये आत्मगौरव निर्माण करण्याचे कार्य केले. कर्म हीच देवाची खरी उपासना असल्याचा त्यांचा प्रमुख संदेश होता, असे प्रतिपादन भगवान रविदास कम्युनिटीज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आर. बी. रोझोदकर यांनी येथे केले.

संत रविदासांचे कार्य सतत प्रेरणादायी - आर. बी. रोझोदकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : संत रविदासांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात समाजातील दुर्बल घटकांमध्ये आत्मगौरव निर्माण करण्याचे कार्य केले. कर्म हीच देवाची खरी उपासना असल्याचा त्यांचा प्रमुख संदेश होता, असे प्रतिपादन भगवान रविदास कम्युनिटीज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आर. बी. रोझोदकर यांनी येथे केले.
खामगाव येथील अमृत इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये आयोजित एक दिवशीय गुरू रविदास समाज प्रबोधन शिबिरात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी खामगावच्या नगराध्यक्षा अनिता डवरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव घुमरे, बीआरसीएफचे राष्ट्रीय महासचिव महादेव शेगांवकर, गणेश इंगळे, मधुकर वानेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगराध्यक्षा अनिता डवरे, लक्ष्मणराव घुमरे यांचीही समयोचित भाषणे झालीत. यावेळी नगरसेवक हिरालाल बोर्डे, नगरसेविका शीतल माळवंदे, वैभव डवरे, सुखदेव शेगोकार, रमेश वानखडे, उत्तम पदमने, प्रा. सोनटक्के, अनिल सुरडकर, उत्तम माने, चिम, पवन माळवंदे, जगन्नाथ शेगोकार, किशोर काकडे, अरूण पानझाडे आदींची उपस्थिती होती. संचालन रमेश वानखडे यांनी केले.
चित्रफितीद्वारे जीवन कार्याचे समालोचन!
संत रविदासाचा इतिहास, त्यांचे महान कार्य यावर आधारित चित्रफित यावेळी समाज बांधवांना दाखविण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी या चित्रफितीचे समालोचनही केले. या मेळाव्याला चर्मकार समाजातील बांधवांची मोठ्यासंखेने उपस्थिती होती.