कंटेनरची कारला धडक; एक ठार, दाेन गंभीर जखमी, लव्हाळा मेहकर मार्गावरील घटना
By संदीप वानखेडे | Updated: March 9, 2024 16:35 IST2024-03-09T16:34:13+5:302024-03-09T16:35:37+5:30
ही घटना ८ मार्च राेजी रात्री लव्हाळा ते मेहकर रस्त्यावरील पाॅवर हाउससमोर घडली. वैभव रामकृष्ण लोखंडे (रा. सुंदरखेड, बुलढाणा) असे मृतकाचे नाव आहे.

कंटेनरची कारला धडक; एक ठार, दाेन गंभीर जखमी, लव्हाळा मेहकर मार्गावरील घटना
हिवरा आश्रम (बुलढाणा) : भरधाव आयशरने कारला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर दाेन जण गंभीर जखमी झाले. ही घटना ८ मार्च राेजी रात्री लव्हाळा ते मेहकर रस्त्यावरील पाॅवर हाउससमोर घडली. वैभव रामकृष्ण लोखंडे (रा. सुंदरखेड, बुलढाणा) असे मृतकाचे नाव आहे.
स्टेट बँकेचे लॉकर घेऊन धुळे येथून हैदराबादला आयशर क्र. एमएच १८ - बीजी ८२२५ जात हाेता. यावेळी औंढा नागनाथ येथून दर्शनाहून बुलढाणा येथे येत असलेल्या कार क्रमांक एमएच २८ - बीके १७९५ला जाेरदार धडक दिली. यामध्ये कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले. तसेच वैभव रामकृष्ण लोखंडे याचा चिखली येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सागर एकनाथ सुरुशे, आदित्य गजानन सुरुशे (सर्व रा. सुंदरखेड, बुलढाणा) हे गंभीर जखमी झाले़ सर्व जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत तसेच अविनाश पंजाब गव्हाने रा. सुंदरखेड बुलडाणा हा किरकोळ जखमी आहे. अपघाताची माहिती मिळताच पोहेकॉ कडुबा डोईफोडे, पोकॉ लक्ष्मण ईनामे, पोकॉ. राजेश गीते, पोकॉ मेहेर यांनी घटनास्थळी मदत केली. दरम्यान, पोलिसांनी आयशर चालकास ताब्यात घेतले आहे.