देऊळगाव राजात काँग्रेसची सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:23 IST2021-07-20T04:23:56+5:302021-07-20T04:23:56+5:30

एकीकडे कोरोना संकट, लॉकडाऊन, वाढती बेरोजगारी यांनी त्रस्त झालेले छोटे व मध्यम उद्योजक व्यापारी तसेच ऐन पेरणीच्या काळात वधारलेले ...

Congress cycle rally in Deulgaon Raja | देऊळगाव राजात काँग्रेसची सायकल रॅली

देऊळगाव राजात काँग्रेसची सायकल रॅली

एकीकडे कोरोना संकट, लॉकडाऊन, वाढती बेरोजगारी यांनी त्रस्त झालेले छोटे व मध्यम उद्योजक व्यापारी तसेच ऐन पेरणीच्या काळात वधारलेले बियाण्याचे, खत, औषधीचे भाव आणि पावसाचा अनियमितपणा अशा अनेक अडचणींमुळे शेतकरी आणि सर्व स्तरातील नागरिक देशोधडीला लागले आहेत़ अशा बिकट परिस्थितीतही केंद्रात ठाण मांडून बसलेले, कुंभकर्णी झोपेत असलेले मोदी सरकारला भारतातील सर्वसामान्य जनतेची काळजी वाटत नसल्यामुळे देऊळगाव राजा तालुका काँग्रेस शहर काँग्रेस सेवा दल व काँग्रेसच्या विविध सेलच्या वतीने महागाईच्या निषेधार्थ भव्य सायकल रॅली काढण्यात आली.

यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व जि. प. सदस्य मनोज कायंदे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. दिलीप सानप, कोषाध्यक्ष अतिश कासारे, रमेश कायंदे, सुभाष दराडे, मल्लिकार्जुन लंगोटे, सिद्धीक शेठ, हनीफ शहा, इस्माईल बागबान, सरपंच गजानन काकड, रामदास डोईफोडे, राजेश बोराटे, सरपंच विश्वनाथ घाडगे, सुखदेव शिरसाट, राजू कांबळे, मुबारख भाई, नरेश कांबळे, रॅम पाटोळे, संतोष मुंडे, गणेश सरोदे, सचिन मुंडे, नाझीम भाई, नासीर भाई, सतीश झिने, सुनील ताठे, गजानन सांगळे, गणेश मुंडे, संतोष मुंडे, विशाल गवई, पुंजाराम नागरे, रामदास सानप, विलास नागरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित हाेते.

Web Title: Congress cycle rally in Deulgaon Raja