शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचा घंटानाद

By admin | Updated: January 10, 2017 02:46 IST

बुलडाणा, धाड, पाडळी, चिखली, मेहकर, जानेफळ, धामणगाव येथे आंदोलन

बुलडाणा, दि. 0९- अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार बुलडाणा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड. शरद राखोंडे यांच्या नेतृत्वात येथील स्टेट बँकसमोर ९ जानेवारी रोजी घंटानाद आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा अचानक रद्द केल्याने शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्गीय व्यापारी व जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नोटाबंदीचा अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन बँक व्यवस्थापक कुलकर्णी यांना देण्यात आले. त्यात नवीन नोटा मुबलक प्रमाणात उपलब्ध कराव्यात, रिझर्व्ह बँकेने त्वरित प्रतिबंध हटवावे, जनधन योजनेमध्ये खात्यात जमा झालेली रक्कम नागरिकांना काढण्याचा अधिकार द्यावा, धनादेशाद्वारे मिळणार्‍या रकमेतून कपात करू नये आदी मागण्या नमूद करण्यात आल्या. यावेळी आंदोलनात विजय अंभोरे, अँड. जयश्री शेळके, सतीश मेहेंदरे, दीपक रिंढे, राजीव काटीकर, दिलीप जाधव, सुनील तायडे, अँड. शरद राखोंडे, पुरुषोत्तम देवकर, सुनील सपकाळ, अँड. सतीशचंद्र रोठे, मोईन काझी, नाजूकराव जाधव, गोपालसिंह राजपूत हरणखेडकर, गौतम मोरे, संदीप बिलारी, पी. डी. महाले, यशपाल ठाकूर, योगेश परशे, राकेश गाडपकर, शेख बब्बू, फिरोज चौधरी, ज्योत्स्ना जाधव आणि बानोबी चौधरी आदी उपस्थित होते. चिखली शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी यांच्या नेतृत्वात घंटा नांद आंदोलन तसेच नोटाबंदीमुळे भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांना होणारा त्रास दूर करण्यात यावा, यासाठी भाजीपाला आंदोलन ९ जानेवारी रोजी करण्यात आले. मेहकर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने केंद्र सरकारने नोटाबंदीचा चुकीच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात शहरातील सर्व शासकीय बँकांसमोर घंटानाद आंदोलन करुन शाखा व्यवस्थापकांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी विविध बँकेच्या शाखांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.