एसटी बस तिकीट दरवाढ विरोधात काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 17:21 IST2018-06-18T17:21:41+5:302018-06-18T17:21:41+5:30
लोणार : १५ जून पासून एसटीच्या तिकीट दरात १८ टक्के दरवाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करणे अवघड झाले आहे. भाडेवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने एसटी चालक-वाहकांना पुष्पगुच्छ देऊन आंदोलन करण्यात आले.

एसटी बस तिकीट दरवाढ विरोधात काँग्रेसचे आंदोलन
लोणार : १५ जून पासून एसटीच्या तिकीट दरात १८ टक्के दरवाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करणे अवघड झाले आहे. भाडेवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने एसटी चालक-वाहकांना पुष्पगुच्छ देऊन आंदोलन करण्यात आले.
एसटीच्या भाडेवाढीमुळे सर्वसामांन्याच्या खिशाला झळ बसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना हा महागडा प्रवास परवडणारा नाही. त्यामुळे दरवाढ कमी करावी, अशी मागणी करीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात पुष्पगुच्छ देऊन सरकार धोरणांचा निषेध करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष भूषण मापारी, जि.प.सदस्य राजेश मापारी, बादशाह खान, साहेबराव पाटोळे, प्रा.सुदन कांबळे, गटनेते शांतीलाल गुगलीया, प्रा.गजानन खरात, पंढरी चाटे, शेख खफ्फार शेख कादर, अरुण जावळे, अंबादास इंगळे, शेख समद शेख अहमद, एजाज खान, सतीश राठोड, विकास सिरसाट, समाधान पाटील उपस्थित होते.