शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीच्या कोंडीमुळे काँग्रेस आक्रमक!

By admin | Updated: May 6, 2017 02:29 IST

कॉग्रेस पदाधिका-यांकडून इशारा; दिरंगाई करणार्‍या अधिका-यांच्या ताेंडाला काळे फासण्याचा इशारा.

चिखली : शासनाने सर्व तूर खरेदीची घोषणा करूनही अद्यापपर्यंत जिल्हय़ातील अनेक केंद्रांवर विविध कारणे समोर करून तूर खरेदी टाळण्यात येत असल्याने शेतकर्‍यांना दिलासा देण्यात यावा व खरेदी केंद्रावर आलेली सर्व तूर दिलेल्या मुदतीत संपूर्णपणे खरेदी करावी, तातडीने चुकारे देण्यात यावे तसेच २२ एप्रिलनंतरही शेतकर्‍यांनी आणलेली तूर खरेदी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे करण्यात आली असून, १0 दिवसांचा अल्टीमेटम देत मुदतीत तूर खरेदी न झाल्यास संबंधित यंत्रणेच्या अधिकार्‍यांना काळे फासण्याचा इशारादेखील दिला आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.राहुल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी जिल्हाध्यक्ष विजय आंभोरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांना ४ मे रोजी याबाबत निवेदन देण्यात आले आहे. जिल्हय़ात शासकीय तूर खरेदी केंद्रावरील शेतकर्‍यांच्या समस्यांसंदर्भात बुलडाणा जिल्हा काँग्रेसने वेळोवेळी विविध आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. बुलडाणा जिल्हय़ात होणार्‍या शासकीय तूर खरेदी केंद्रावरील शेतकर्‍यांच्या समस्यांसंदर्भात बुलडाणा जिल्हा कॉंग्रेसने वेळोवेळी विविध आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यात २१ एप्रिल रोजी जिल्हय़ातील प्रत्येक तालुका स्तरावर ठिय्या आंदोलन, तर २९ एप्रिल रोजी जिल्हाभर प्रत्येक तहसील कार्यालयासमोर उठबशा आंदोलन करून तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले होते. निवेदनामध्ये शेतकर्‍यांच्या तुरीचा पूर्ण माल खरेदी करण्यात यावा, तुरीचे चुकारे त्वरित अदा करण्यात यावे, सर्व ठिकाणी त्वरित बारदाना उपलब्ध करून दयावा, २२ एप्रिलपर्यंत तूर खरेदी केंद्रावरील जमा असलेली तसेच २२ एप्रिल नंतरही शेतकर्‍यांनी खरेदी केंद्रावर आणलेली तूर खरेदी करण्यात यावी, संथ गतीने सुरू असलेली तुरीची खरेदी जलद गतीने सुरू करण्यात यावी, आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून, येत्या १0 दिवसात खरेदी केंद्रावरील संपूर्ण तूर खरेदी न केल्यास व या कामात टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.