पेनटाकळी प्रकल्पात सुरू असलेल्या उपोषणाची चौथ्या दिवशी सांगता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 14:42 IST2021-02-09T14:41:53+5:302021-02-09T14:42:17+5:30
Buldhana News चर्चा करून सोमवारी चौथ्या दिवशी हे उपोषण सोडविण्यात आले.

पेनटाकळी प्रकल्पात सुरू असलेल्या उपोषणाची चौथ्या दिवशी सांगता!
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा आश्रम: दुधा, ब्रम्हपूरी, रायपूर या परिसरातील शेतकऱ्यांचे पेनटाकळी धरणात उपोषण सुरू होते. आ.डॉ. रायमूलकर यांनी पेनटाकळी प्रकल्पावर जाऊन उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून सोमवारी चौथ्या दिवशी हे उपोषण सोडविण्यात आले.
पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी पाईपलाईनद्वारे देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी सकाळपासून पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. आ.डॉ.संजय रायमूलकर यांच्या मध्यस्तीने गेल्या तीन दिवसांपासून पेनटाकळी धरणात पाण्यात सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण सोमवारी सुटले. आ.डॉ.संजय रायमूलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव यांनी उपोषण करणाऱ्यांना शेतकऱ्यांना शरबत पाजून उपोषण सोडविले. पेनटाकळी धरणाचा मुख्य कालवा ० ते ११ किलोमीटर मध्ये पाईप लाईनव्दारे पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांचे कालव्याच्या पाझरणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मुख्य कालव्याचे अस्तरीकरणाचे काम न झाल्यामुळे कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी पाझरून परिसरातील शेतीचे व पिकांचे नुकसान होत होते. कालव्यामुळे दुधा, ब्रम्हपूरी, रायपूर या परिसरातील शेतकऱ्यांचे पावसाळ्यातील खरीप पिकांचे व रब्बी पिकांचे लाखो रूपयांचे नुकसान होत होते. सोमवारी जयंत पाटील यांचेशी आ.रायमुलकर यांनी चर्चा करुन या शेतकऱ्यांच्या मागणीची मंजूरी घेवून हे उपोषण सोडविले.