सर्वसामान्यांचा लोकनेता हरपला..

By Admin | Updated: June 4, 2014 00:47 IST2014-06-04T00:03:51+5:302014-06-04T00:47:37+5:30

ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त धडकताच बुलडाणा जिल्हा शोकमग्न झाला.

The common people lost the popularity .. | सर्वसामान्यांचा लोकनेता हरपला..

सर्वसामान्यांचा लोकनेता हरपला..

बुलडाणा : सर्वसामान्यांचा लोकनेता, शेतकर्‍यांचे नेते, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण करणारे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त धडकताच बुलडाणा जिल्हा शोकमग्न झाला. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील गोपीनाथ मुंडे यांनी शैक्षणिक काळापासून राजकारणाला सुरुवात केली होती. त्यांचा ग्रामीण भागातील गावकर्‍यांसोबत चांगला संबंध होता. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेने त्यांचे नेतृत्व स्वीकारले होते. विदर्भासह बुलडाणा जिल्ह्यातील भाजपातील अनेक कार्यकर्त्यांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध होते. त्यांच्या निधनाचे वृत्त धडकताच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सर्वत्र शोककळा पसरली. लोणार, मेहकर, सिंदखेड राजा तालुक्यात त्यांच्या चाहत्यांनी स्वयंस्फूर्त बंद पाळण्यात आला. मेहकर व साखरखेर्डा येथे शोकसभा घेण्यात आली. लोणार येथे संतप्त कार्यकर्त्यांनी एसटीवर दगडफेक केल्याने एसटी बसेसचे मोठे नुकसान झाले. मेहकर येथे शिवसेना कार्यालयात शोकसभा घेण्यात आली. शोकसभेनंतर महायुतीच्यावतीने शहरात फेरफटका मारून व्यापार्‍यांना बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले. बुलडाणा येथेही भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. उद्या परळीमध्ये होणार्‍या अंत्यसंस्कारला उपस्थित राहण्यासाठी कार्यकर्ते परळी येथे रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे आज दे. राजा, सि. राजा परिसरातील सर्व वाहने परळी येथे जाण्यासाठीच बुक करण्यात आली आहेत.

Web Title: The common people lost the popularity ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.