विकासासाठी एकत्र या!

By Admin | Updated: November 23, 2015 01:17 IST2015-11-23T01:17:42+5:302015-11-23T01:17:42+5:30

कान्हुसतीमाता यात्रा महोत्सवात जानकर यांचे आवाहन.

Come together for the development! | विकासासाठी एकत्र या!

विकासासाठी एकत्र या!

धामणगाव बढे (जि. बुलडाणा): लोकशाहीमध्ये समाजाची ताकद बघून राज्यकर्ते त्यांना महत्त्व देतात. मंदिरं मोठी झाली म्हणून समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी समाजाच्या विकासाच्या प्रश्नावर एकत्र यावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी केले. ते पान्हेरा खेडी येथे आदिशक्ती सतीमाता यात्रा महोत्सवात आयोजित बेलदार समाज मेळाव्यात बोलत होते. पान्हेरा येथील सतीमातेच्या तीर्थक्षेत्राला ह्यबह्ण दर्जा मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे आग्रह करू, असेही यावेळी त्यांनी सांगितले. स्थानिक सतीमाता मंदिराला प्राथमिक सुधारणांसाठी १0 लाख रुपयांचा आमदार निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी खा. प्रतापराव जाधव, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, आ. हर्षवर्धन सपकाळ, जिंतूरचे आमदार विजयराज भाबळे, माजी आमदार विजयराज शिंदे, मुख्त्यारसिंह राजपूत, भोजराज पाटील, जालिंदर बुधवत, संजय गायकवाड, पान्हेराचे सरपंच सुनील वैराळकर, सतीमाता संस्थानचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण, बापूसाहेब शिंदे उपस्थित होते.

Web Title: Come together for the development!