भरधाव दुचाकींची धडक, दोन जागीच ठार; कंझारा फाट्याजवळील घटना
By अनिल गवई | Updated: November 6, 2023 10:50 IST2023-11-06T10:50:17+5:302023-11-06T10:50:58+5:30
खामगाव बुलढाणा रस्त्यावरील कंझारा फाट्याजवळ घडली.

भरधाव दुचाकींची धडक, दोन जागीच ठार; कंझारा फाट्याजवळील घटना
अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने घडलेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. ही घटना रविवारी रात्री खामगाव बुलढाणा रस्त्यावरील कंझारा फाट्याजवळ घडली.
याबाबत सविस्तर असे की, खामगाव येथील हरीफैल भागातील किशोर गोविंद कवठेकर ३५ आणि गेरू माटरगाव येथील सुरेश दादाराव चव्हाण ३२ या दोघांच्या दुचाकीमध्ये कंझारा फाटयाजवळ भीषण अपघात झाला. या अपघाताची भीषणता इतकी होती की, दोघेही जागीच ठार झाले. मृत अवस्थेत त्यांना खामगाव येथील सामान्य रूग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. सामान्य रूग्णालयाचे डॉ. प्रंशात वानखडे यांच्यावतीने कक्षसेवक प्रभाकर किसन राठोड ३९ यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीसांनी दोघांच्याही मृत्यूबाबत कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.