शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

वातावरणातील बदलाने होरपळताहेत बुलडाणा जिल्ह्यातील उन्हाळी पीके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 17:34 IST

बुलडाणा : वातावरणात अचानक होत असलेल्या या बदलामुळे जिल्ह्यातील २ हजार ४६५ हेक्टर क्षेत्रावरील उन्हाळी पिके होरपळून निघत आहेत.

ठळक मुद्दे जिल्ह्यात एकूण २ हजार ४६५ हेक्टर क्षेत्रावर मका, सुर्यफुल, भुईमुंग, तीळ, मुंग व इतर उन्हाळी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. वातावरणात अचानक होत असलेल्या या बदलामुळे जिल्ह्यातील २ हजार ४६५ हेक्टर क्षेत्रावरील उन्हाळी पिके होरपळून निघत आहेत.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात वातावरणात अचानक बदल झाला असून, कधी ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत; तर कधी अचानक उन्हाचा पार वाढत आहे. वातावरणात अचानक होत असलेल्या या बदलामुळे बुलडाणा जिल्ह्यातील २ हजार ४६५ हेक्टर क्षेत्रावरील उन्हाळी पिके होरपळून निघत आहेत. त्याचरबरोबर जलपातळी खालावल्याने हजारो हेक्टरवरील पिकांवर जलसंकट घोंगावत आहे.जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून उन्हाळी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ज्यांच्याकडे ओलीताची सोय आहे, असे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी सध्या उन्हाळी पिके घेत आहेत. उन्हाळी पिकांचे सरासरी क्षेत्र १ हजार ८१० असून यात दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ४६५ हेक्टर क्षेत्रावर मका, सुर्यफुल, भुईमुंग, तीळ, मुंग व इतर उन्हाळी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यात सरासरी क्षेत्र २३० हेक्टर असून, ३२० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. चिखली तालुक्यात २० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी १८२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बुलडाणा तालुक्यात १४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ६२.४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. देऊळगाव राजा तालुक्यात ४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ६६८.५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मेहकर तालुक्यात २४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ६०४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सिंदखेड राजा तालुक्यात नियोजन नसतांनाही १३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. लोणार तालुक्यात २२० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ४४.५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खामगाव तालुक्यात ३५० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ९७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मलकापूर तालुक्यात ४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ४२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मोताळा तालुक्यात ४० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी १९०.५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नांदुरा तालुक्यात नियोजन नसतांनाही ११९ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. मात्र सध्या वातावरणातील बदलाचा परिणाम पिकांवर होत आहे. उन्हाची तिव्रता वाढत असताना अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी बरसत असल्याने उन्हाळी पिकांना फटका बसत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती