शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

वर्ग सुरू झाले नाही, तरी शैक्षणिक सत्र सुरू होणार -  एजाज खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 17:05 IST

र्ग सुरू झाले नाही, तरी नवे शैक्षणिक सत्र सुरू होईल, असे मत प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी व्यक्त केले.

- ब्रह्मानंद जाधवबुलडाणा : राज्य शासन १५ जूनपासून शाळा, महाविद्यालय सुरू करण्याच्या विचारात आहे. परंतू काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. रुग्ण असलेल्या ठिकाणी किंवा शाळा क्वारंटीन सेंटर असेल, अशा ठिकाणी शाळा भरवणे अवघड आहे. त्यामुळे वर्ग सुरू झाले नाही, तरी नवे शैक्षणिक सत्र सुरू होईल, असे मत प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी व्यक्त केले. कोरोनाचे वाढते रुग्ण आणि शाळा सुरू करण्याबाबत  शिक्षणाधिकारी एजाज खान यांच्याशी साधलेला संवाद... 

शाळा सुरू करण्याबाबत प्रत्यक्षात काय स्थिती आहे?शाळा सुरू केंव्हा होणार यावर निर्णय वरिष्ठ पातळीवरुन होत आहे. परंतू ज्या ठिकाणी शाळा भरवायची त्याठिकाणचे पालक, शाळा व्यवस्थापन समिती यांनाही विश्वासात घेतले जाणार आहे. त्या गावात रुग्ण नसलीत, शाळा क्वारंटीन नसेल, तर अशा ठिकाणी शाळा भरवण्यास काहीच हरकत नाही.  

रुग्ण असलेल्या भागात नवीन सत्र कसे सुरू करणार?  ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आहेत, त्याठिकाणी वर्ग सुरू करू शकत नाहीत, अशा ठिकाणी आॅनलाइन शिक्षण प्रणालीचा वापर करू. स्थानिक केबल नेटवर्कचाही यासाठी उपयोग केला जाऊ शकतो. प्रशिक्षीत शिक्षकांचे व्हिडीओ पालकांच्या मोबाईलवर पाठवून ते विद्यार्थ्यांना दाखवून दिल्या जातील. त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.    

ग्रामीण भगाात आॅनलाइन शिक्षणासाठी अडचणी येऊ शकतात का? ग्रामीण भागातील पालकांकडे स्मार्ट फोन असण्याची शक्यता कमी आहे. त्याची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्याच्याकडे मोबाईल नाही, त्या विद्यार्थ्याला मोबाईल असलेल्या विद्यार्थ्यासोबत बसविता येईल. गर्दी न होता एका मोबाईलवर दोन विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. अशाप्रकारे ९० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहचू शकतो.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय नियोजन आहे? ज्या गावातील शाळा सुरू होतील, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अरोग्याची सुरक्षा घेण्याच्या अनुषंगाने नियोजन केलेले आहे. त्या शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, यासाठी विद्यार्थ्यांना विषम संख्येप्रमाणे शाळेत बोलाविण्यात येईल. तसे विद्यार्थ्यांना नंबर दिलेले आहेत. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दोन सत्रात शाळा घेण्यात येईल. शाळा सॅनिटाईज करून वापरणे, शाळेत मुलांना तीन वेळा हात धुण्यासाठी साबन, सॅनिटायझर ठेवण्यात येईल.

लॉकडाउनमध्ये आॅनलाइन अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यापूर्वी क्वारंटीन असलेल्या शाळा आता निर्जंतुकीकरण करून वापरण्यात येतील. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखतEducationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी