कारखेड येथे दोन गटांत हाणामारी

By Admin | Updated: March 4, 2017 00:50 IST2017-03-04T00:50:08+5:302017-03-04T00:50:08+5:30

१३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

Clashes in two groups at Karkhed | कारखेड येथे दोन गटांत हाणामारी

कारखेड येथे दोन गटांत हाणामारी

अमडापूर(जि. बुलडाणा), दि. ३- येथून जवळच असलेल्या कारखेड येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटांत लाठय़ाकाठय़ाने हाणामारी होऊन दोन्हीकडील काही लोक जखमी झाल्याची घटना २ मार्च रोजी घडली.
याबाबत परस्परविरोधी तक्रारीवरून अमडापूर पो.स्टे.ला गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ऊर्मिला पुरूषोत्तम काळे या महिलेने तक्रार दिली, की २ मार्च रोजी रात्री ९.३0 वाजेला राहत्या घरात असताना आरोपी गणेश पंडित याने घरात डोकावून पाहिले. त्याला हटकले असता आरोपी गणेश पंडित, आरती गणेश पंडित, रमेश मापारी, योगेश पंडित, शंकर पंडित, ज्ञानेश्‍वर पंडित यांनी हातात लाठय़ाकाठय़ा घेऊन पती व दिरांना मारहाण करून जखमी केले, अशी तक्रार ऊर्मिला पुरूषोत्तम काळे (वय २९) रा.कारखेड यांनी दिल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच आरती गणेश पंडित यांच्या तक्रारीवरून अमोल काळे, पुरूषोत्तम काळे, मनोहर काळे, केसर काळे, ऊर्मिला काळे, एकनाथ काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Clashes in two groups at Karkhed