दोन गटात हाणामारी

By Admin | Updated: March 31, 2017 02:19 IST2017-03-31T02:19:24+5:302017-03-31T02:19:24+5:30

गावातील पती- पत्नीचा वाद विकोपाला गेल्याने या वादाचे दोन गटातील हाणामारीत रुपांतर झाले.

Clash in two groups | दोन गटात हाणामारी

दोन गटात हाणामारी

अमडापूर(जि. बुलडाणा), दि. ३0- गावातील पती- पत्नीचा वाद विकोपाला गेल्याने या वादाचे दोन गटातील हाणामारीत रुपांतर झाले. याप्रकरणी परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीनुसार २४ जणांवर गुरुवारी दुपारी गुन्हे दाखल झाले. शारीक खान युसूफ खान याने तक्रार दिली की, २९ मार्च रोजी जेवणाच्या कार्यक्रमात हजर असताना मोठय़ा भावास आरोपी शे.अबशर शे.बाबु यांने माझ्या बहिणीला का नांदवत नाही, या कारणावरून आरोपी शे.अफजल शे.बाबुशे शफीउल्ल शे.रहीमतुल्ला, शे.शादाब शे.शफीतुलना, शे.शैजाद शे.बाबू, शे.मुजाहीद शे.शफीउल्ला, शे.दिलशाह शे.बर्रानी, आशिया परवीन शे.अबरात राहत परवीन शे.अफजल, फरजाना परवीन शैजाद शे.बाबुशे, अजीस, साकेनुर बीशे बाबू, मालण बी शे.शफीउल्ला, इशरत परवीन आसीफ खान यांनी लोखंडी पाइपने हातावर, पाठीवर व भावास डोक्यावर मारुन जखमी केले. या तक्रारीवरून १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५0४, ५0६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला. इशरत अन्जुम आसीफ खान (वय २२ वर्षे रा.अमडापूर) हिने तक्रार दिली त्यावरून दुसर्‍या गटातील आरोपीविरूद्धदेखील गुन्हा दाखल झाला.

Web Title: Clash in two groups