दोन गटांत हाणामारी
By Admin | Updated: March 28, 2015 00:42 IST2015-03-28T00:17:36+5:302015-03-28T00:42:07+5:30
भोकरदन : शहरातील काँग्रेसचे नगरसेवक राजू खिरे व राष्ट्रवादीचे नगरसेवक शेख नजीर यांच्यासह दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.

दोन गटांत हाणामारी
भोकरदन : शहरातील काँग्रेसचे नगरसेवक राजू खिरे व राष्ट्रवादीचे नगरसेवक शेख नजीर यांच्यासह दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. परस्पर विरोधी तक्रारीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात १८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत रतन खिरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी नगरसेवक शेख नजीर महमद इलियास, शेख अली शेख इलियास आदींनी २६ मार्च रोजी सांयकाळी ५़३० वाजेच्या दरम्यान फिर्यादीचा मुलगा नगरसेवक राजू खिरे यास एस़बी़आय बँकेजवळ शिवीगाळ केली. आरोपींनी फिर्यादीचे घरी येऊन जातीवाचक शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली.
माजी नगरसेविका मालनबाई खिरे व नगरसेवक राजू खिरे यांना मारहाण केली. नगर पालिका निवडणुकीपासून दोन्ही गटांमध्ये वाद आहेत.याप्रकरणी रतन खिरे यांच्या तक्रारीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात वरील आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर राष्ट्रवादीचे स्वीकृत सदस्य शेख नजीर मोहमद इलियास यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान आरोपी कॉंग्रेसचे नगरसेवक राजू खिरे, रतन खिरे, संजु खिरे, सतीष खिरे, संदीप खिरे, शांतीलाल बडोदे, अशोक बडोदे, हिरालाल बडोदे, उमेश बडोदे, नितीन बडोदे व इतर ४ ते ५ जणांनी तलाठी कार्यालय सिल्लोड रोड येथे येऊन वाळूचे ट्रॅक्टर का पकडून देतो म्हणून शेख नजीर यास मारहाण करून माझ्या जवळील १ लाख रूपये नगदी व सोन्याची अंगठी काढून घेतली व फिर्यादीच्या घरी जाऊन आरोपीनी त्याच्या गळ्यातील ३० ते ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने काढून घेऊन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने भोकरदन शहरात एकच खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)