सातगाव भुसारीत युवकांच्या दोन गटात हाणामारी

By संदीप वानखेडे | Updated: April 27, 2024 18:24 IST2024-04-27T18:24:05+5:302024-04-27T18:24:42+5:30

१८ आरोपींना अटक : पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने टळला अनर्थ.

Clash between two groups of youths in Satgaon Bhusari | सातगाव भुसारीत युवकांच्या दोन गटात हाणामारी

सातगाव भुसारीत युवकांच्या दोन गटात हाणामारी

पिंपळगाव सराई : रायपूर पाेलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सातगाव भुसारी येथे किरकाेळ कारणावरून युवकांच्या दाेन गटात २६ एप्रिल राेजी रात्री तुंबळ हाणामारी झाली. पेट्रोलिंग करीत असलेल्या पाेलिसांच्या ही बाब लक्षात येताच दंगाकाबू पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने काही मिनिटातच गावात दाखल हाेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पाेलिसांनी रात्रभर शाेधमाेहीम राबवत १८ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली.

सातगाव भुसारी येथे किरकाेळ कारणावरून दाेन गटात रात्री ९.३० वाजता हाणामारी झाली. युवकांच्या दाेन गटाने एकमेकांवर लाठ्याकाठ्याने हल्ला केला. ही बाब गावातच पेट्रोलिंग करीत असलेल्या पाेलिसांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने वरिष्ठांना माहिती दिली. वरिष्ठांच्या आदेशाने तातडीने दंगाकाबू पथक, रायपूर आणि चिखली येथील पाेलिसांना घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. पथक दाखल हाेताच गावात मध्यरात्री आराेपींची शाेधमाेहीम राबविण्यात आली. पाेलिसांनी रात्रीतूनच १८ आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत व पोलिस स्टाफ दंगाकाबू पथक बुलढाणा, पो. स्टे. चिखली व धाड पोलिस स्टाफ यांनी केली.

आराेपींमध्ये यांचा समावेश
पाेलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या आराेपींमध्ये विशाल रमेश गाडे, अमोल दत्तात्रय भुसारी, युवराज संजय काळे, ऋषिकेश अनिल भुसारी, अंकलेश गजानन भुसारी, सागर राजेंद्र भुसारी, पंकज दिलीप भुसारी, विशाल गजानन ढगे, ऋषिकेश संजय सोनाळकर, रवींद्र गणेश वाघ, स्वप्नील संजय मोरे, संजय सुगदेव मोरे, राहुल राजू मोरे, सूरज अरुण जाधव, सागर वसंता जाधव, गणेश सुरेश जाधव, राहुल प्रकाश इंगळे, प्रवीण सखाराम हिवाळे व सर्व रा. सातगाव भुसारी यांचा समावेश आहे.
 

Web Title: Clash between two groups of youths in Satgaon Bhusari