नागरिकांनी सजगता बाळगावी - इंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:34 IST2021-04-27T04:34:59+5:302021-04-27T04:34:59+5:30
हिवरा आश्रम : कोराेना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्येत झापाट्याने वाढ होत आहे. हे थांबविण्यासाठी प्रशासनाने नियम घालून दिले आहेत. ...

नागरिकांनी सजगता बाळगावी - इंगळे
हिवरा आश्रम : कोराेना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्येत झापाट्याने वाढ होत आहे. हे थांबविण्यासाठी प्रशासनाने नियम घालून दिले आहेत. त्याची नागरिकांनी अंमलबजावणी करुन ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच प्राजक्ता इंगळे यांनी केले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, हिवरा आश्रम येथे सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पूर्ण प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करुन सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
यावेळी सरपंच प्राजक्ता इंगळे, नितीन इंगळे, माजी सरपंच मनोहर गिऱ्हे, ग्रामविकास अधिकारी सदाशिव मस्के उपस्थित होते.
काेट
प्रशासनाच्या आदेशानुसार हिवरा आश्रम येथे कोरोना चाचणी व लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे.
सदाशिव म्हस्के, ग्रामविकास अधिकारी, हिवरा आश्रम