नागरीकांनी काढले स्वत:हून अतिक्रमण
By Admin | Updated: June 5, 2014 00:14 IST2014-06-04T23:34:15+5:302014-06-05T00:14:28+5:30
बुलडाणा-मलकापूर राज्यमार्गावरील टपरीधारकांनी स्व त:हून अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली आहे.

नागरीकांनी काढले स्वत:हून अतिक्रमण
साखरा : सेनगाव तालुक्यातील साखरा परिसराचा वीजपुरवठा १ जूनच्या रात्रीपासून खंडित झाला आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत आहे. साखरा गावाला हत्ता येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. साधारणत: ५ हजार लोकसंख्येच्या या गावातील ९९ टक्के घरांमध्ये वीजजोडणी आहे. तसेच शेतीला पाणी देण्यासाठी कृषी पंपांसाठी वीज जोडणी घेण्यात आलेली आहे. काही दिवसांपुर्वी विजेच्या तारा तुटल्या होत्या. त्या दुरूस्त करण्यात आल्यानंतर पुन्हा लगेच वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी गावात विजेवर चालणारी सर्व उपकरणे बंद असून ग्रामस्थांना धान्य दळून आणण्यासाठी पीठ गिरण्याही बंद आहेत. गावातील नळयोजना अनेक दिवसांपासून बंद असल्याने बहुतांश ग्रामस्थांनी पाण्यासाठी बोअर घेतलेले आहेत; परंतु विजेअभावी बोअर सुरू करणे शक्य नसल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. काही जण शेतातील विहिरीवरून शेंदूण पाणी आणत आहेत. विजेचा पुरवठा खंडित झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांचे हाल होत आहेत. यासंदर्भात साखरा येथील लाईनमन धुळे यांना विचारले असता, हिंगोली- सेनगाव विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने गावात विजेची समस्या निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अनेकवेळा हिंगोली येथील मुख्य विद्युत वाहिनीत बिघाड झाल्यानंतर सेनगाव, पानकनेरगाव, पुसेगाव, आजेगाव, हत्ता येथील विद्युत उपकेंद्रावर त्याचा परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)