नांदुरा येथील जीवनावश्यक वस्तू दुकानांवर समोर आखलीत वर्तुळं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 14:58 IST2020-03-28T14:58:02+5:302020-03-28T14:58:12+5:30
दूकानदारांनी वतूर्ळे काढून काटेकोरपणे पालन केल्याचे दिसून आले.

नांदुरा येथील जीवनावश्यक वस्तू दुकानांवर समोर आखलीत वर्तुळं!
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : कोरोना विषाणूंच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव प्रभावी मार्ग असल्याने तहसिलदार राहूल तायडे यांनी शहरात फीरून दूकानदारांना आपल्या दूकानांसमोर वतूर्ळे आखण्याचे निर्देश दीले. त्यानंतर दूकानदारांनी वतूर्ळे काढून काटेकोरपणे पालन केल्याचे दिसून आले.
१४ एप्रील पर्यंत सर्वत्र लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामूळे आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरीकांची एकच गर्दी होत आहे. त्यामूळे गर्दी होवू नये यासाठी खबरदारी घेत तहसीलदार यांनी दूकानांबाहेर वर्तूळ काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. कीराणा, ओषधी, भाजी , यासह अन्य दूकानांच्या बाहेर काढण्यात आलेल्या वतूर्ळातच ग्राहकांनी ऊभे रहायचे आहे. कोरोना विषाणूच्या संसगार्ची साखळी तोडण्यासाठी हाच ऐकमेव प्रभावी मार्ग असल्याने नागरीकांनी वस्तू खरेदी करतांना दूकानाच्या बाहेर एकमेकांपासून अंतर ठेवून ऊभे रहावे, असे आवाहन तहसीलदार राहूल तायडे यांनी केले.