शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

लोणार सरोवर परिसरातील पक्षीवैभवावर विचार मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 16:37 IST

लोणार सरोवर परिसरातील पक्षीवैभवावर विचार मंथन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : पक्षीमित्र संयोजित दोन दिवसीय २० वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन ८ फेब्रुवारी पासून लोणार शहरातील भगवान बाबा महाविद्यालय येथे सुरु झाले आहे. सेवाग्राम येथून आलेल्या सायकल रॅलीच्या स्वागत संमेलनाचे उद्धघाटन करण्यात अले. लोणार सरोवर परिसरातील पक्षीवैभवावर विचार मंथन झाले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी लोणारकर टीमने गेल्या काही वर्षात राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवराचे पक्षीवैभवाविषयी मी लोणारकर टीमचे अरुण मापारी व विलास जाधव यांनी माहिती सांगितली. खा. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पक्ष्यांची माहिती असलेल्या पुस्तकांचे प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. लोणार सरोवराचा पाहिजे तसा विकास होऊ शकला नाही, ही आपल्या सर्वांसाठी दुदेर्वाची बाब आहे. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लोणार सरोवर विकासाकडे विशेष लक्ष असून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे असल्याने लोणार सरोवराच्या विकासाच्या आशा नक्कीच पल्लवित झाल्या आहे. लोणार सरोवराच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना लोणार सरोवरला येण्याबाबत चर्चा केल्याचेही खा.प्रतापराव जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात अजय डोळके यांनी पक्षी महती दिली. सरोवाराशी जडले नाते यावर माहितीपट दाखवण्यात आला. यावेळी माजी न्यायाधीश बाळासाहेब सांगळे, डॉ. एस. जी. बडे, महाराष्ट्र पक्षीमित्र अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, तहसीलदार सैपन नदाफ, शिवछत्र मित्र मंडळ अध्यक्ष नंदकिशोर मापारी, शिवसेना तालुका प्रमुख बळीराम मापारी, भूषण मापारी, नूर मंहमद खान, जिल्हा ग्राहक सरंक्षण परिषद सदस्य डॉ. भास्कर मापारी, विलास जाधव, सुरेश तात्या वाळूकर, डॉ. दयानंद ओव्हर, जितेंद्र सानप यांचेसह शेकडो पक्षीमित्र उपस्थित होते.

पक्षीमित्रांची चळवळ व पुढील वाटचालविदर्भ पक्षीमित्र संमेलनाच्या पहिल्या दिवशी वैदर्भीय पक्षीमित्रांची चळवळ व पुढील वाटचाल या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. हे चर्चासत्र चांगलेच रंगले. आयुर्वेदातील पक्षीजगत, शेती- शेतकरी व पक्षी संबंध, पक्षीविषयक वनकायदे यावर मान्यवरांनी विचार व्यक्त केले. दोन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाच्या स्मरणीकेचे विमोचन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :lonar bird sanctuaryलोणार पक्षी अभयारण्यLonarलोणारlonar sarovarलोणार सरोवर