फटका तोंडावर फुटल्याने बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 13:16 IST2018-11-02T13:15:56+5:302018-11-02T13:16:15+5:30
पिंपळगाव सराई (जि.बुलडाणा): रेतीच्या ढिगाऱ्यावर खेळत असलेल्या सहा वर्षीय बालकाच्या तोंडावरच सुतळी बॉम्ब (फटाका) फुटल्याने गंभीर जखमी झालेल्या या बालकाचा रुग्णालयात मृत्यू झाला.

फटका तोंडावर फुटल्याने बालकाचा मृत्यू
पिंपळगाव सराई (जि.बुलडाणा): रेतीच्या ढिगाऱ्यावर खेळत असलेल्या सहा वर्षीय बालकाच्या तोंडावरच सुतळी बॉम्ब (फटाका) फुटल्याने गंभीर जखमी झालेल्या या बालकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना ३० आॅक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.
यश संजय गवते असे मृत्यू पावलेल्या बालकाचे नाव आहे. जिल्हा मुख्यालयापासून २५ किलोमीटर अंतरावर मराठवाड्याच्या सीमेलगत असलेल्या पिंपळगाव सराई येथे ही दुर्देवी घटना घडली. दुपारी एक वाजेच्या सुमारास यश हा घरासमोरील रेतीच्या ढिगार्यावर खेळत होता. तेथे असलेला सुतळी बॉम्ब (फटाका) त्याने हातात घेतला असता अचानक तो फुटला. त्यात यशच्या चेहऱ्याला व छातीला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्याचे वडील संजय गवते यांनी त्यास तातडीने प्रथम खासगी रुग्णालयात व त्यानंतर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, शवविच्छेदनानंतर यशच्या पार्थिवावर पिंपळगाव सराई येथे सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
ब्लॉस्ट इंज्युरीमुळे मृत्यू
ब्लास्ट इंज्युरीमुळे यश संजय गवते या सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. त्याच्या चेहर्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन करणारे डॉ. रवी शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.