शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

चिखली : थेट सरपंच निवडीत काँग्रेसने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:24 AM

चिखली: तालुक्यात प्रथम झालेल्या सरपंच पदाच्या थेट  निवडणुकीत चिखली तालुक्यात काँग्रेसने बाजी मारली असून,  निवडणूक झालेल्या तालुक्यातील २८ पैकी १७ ग्रामपंचयतींमध्ये  काँग्रेस प्रणित सरपंच पदाचे उमेदवार निवडून आणण्यात  काँग्रेसला यश आले असून, निवडणुकीचे निकाल जाहीर  झाल्यानंतर गावोगावच्या नागरिकांचे जथ्थे व विजयी  उमदेवारांनी आमदार राहुल बोंद्रे यांची जनसेवा कार्यालयावर  भेट घेऊन जल्लोष साजरा केला.

ठळक मुद्देतालुक्यातील २८ पैकी १७ ग्रामपंचायतींवर दावाकव्हळा ग्रामपंचायतवर काँग्रेसचे वर्चस्व

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: तालुक्यात प्रथम झालेल्या सरपंच पदाच्या थेट  निवडणुकीत चिखली तालुक्यात काँग्रेसने बाजी मारली असून,  निवडणूक झालेल्या तालुक्यातील २८ पैकी १७ ग्रामपंचयतींमध्ये  काँग्रेस प्रणित सरपंच पदाचे उमेदवार निवडून आणण्यात  काँग्रेसला यश आले असून, निवडणुकीचे निकाल जाहीर  झाल्यानंतर गावोगावच्या नागरिकांचे जथ्थे व विजयी  उमदेवारांनी आमदार राहुल बोंद्रे यांची जनसेवा कार्यालयावर  भेट घेऊन जल्लोष साजरा केला. तालुक्यातील पाटोदा, कर तवाडी, आंधई, उंद्री, चंदनपूर, पेनसावंगी, कव्हळा,  मिसाळवाडी, रानअंत्री, बेराळा, गुंजाळा, सातगांव भुसारी,  किन्ही सवडत, वरखेड, भानखेड, मनुबाई व महिमळ या १६  गावाचे सरपंच पदाचे विजयी उमेदवार हे काँग्रेस प्रणित  असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले असून, वरील गावातील सर्व  विजयी सरपंच व सदस्यांनी ग्रामस्थांसह जनसेवा कार्यालयावर  येऊन आनंद साजरा केला. दरम्यान, गत काळात केंद्रात व  राज्यात असलेल्या भाजप सरकारकडून सर्वसामान्य जनतेला  वेठीस धरीत त्यांच्यावर लादलेली महागाई व भाववाढ,  निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनाला हरताळ फासत, सुरू  असलेला मनमानी कारभार, नोटाबंदी, जीएसटी, कर्जमाफी,  यासारखे ग्रामीण जनतेला उद्ध्वस्त करणारे निर्णय, यामुळे  ग्रामीण भागात भाजपाविषयी नाराजीचे वातावरण होते. त्याचाही  परिणाम या निवडणुकीत जास्तीत जास्त काँग्रेसचे उमेदवार  निवडून येण्यात झाल्याचे या निवडणुकीत दिसून आल्याची प्र ितक्रिया काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष कैलास खंदारे व  शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी यांनी दिली आहे. 

कव्हळा ग्रामपंचायतवर काँग्रेसचे वर्चस्वतालुक्यातील उंद्री आणि कव्हळा या ग्रामपंचायतीमध्ये दीर्घकाळ  भाजपचाच वरचष्मा राहिला आहे; परंतु काँग्रेसकडून उंद्रीमध्ये  भूमीमुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे यांना  पक्षात सामावून घेत आमदार राहुल बोंद्रे यांनी उमेदवारी दिली.   त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला व पहिल्यांदाच थेट  निवडणुकीतून तालुक्यातील मोठय़ा ग्रामपंचायतींपैकी एक  असलेली उंद्री ग्रामपंचायत काँग्रेस ताब्यात आली आहे.  त्याचबरोबर कव्हळा येथेही अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत ही  ग्रामपंचायत काँग्रेसने हस्तगत केली असून, ग्रामपंचायत सदस्य  पदाच्या निवडणुकीतही काँग्रेसनेच व्यापक यश संपादन केले  असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.