शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री आज घेणार जिल्हा आढावा बैठक

By admin | Updated: May 6, 2017 02:37 IST

जलयुक्त शिवार अभियानातील विविध कामांची करणार पाहणी!

बुलडाणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, पंतप्रधान आवास योजना आदी उपक्रमांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांची शनिवारी पाहणी करणार आहेत. तसेच जिल्हा आढावा बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे सकाळी ८.३0 वाजता रामगिरी हेलिपॅड येथे आगमन होणार असून, हेलिकॉप्टरने जळगाव जामोद येथे जाणार आहेत. सकाळी ९.५0 वाजता गाडेगाव बु. येथे मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत घेतलेल्या शेततळ्याच्या कामाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी १0 वाजता गाडेगाव बु. येथून मोटारीने गाडेगाव खुर्द ता. जळगाव जामोदकडे प्रयाण, गाडेगाव खुर्द येथे आगमन व नाला खोलीकरण कामाची पाहणी, सकाळी १0.१५ वाजता गाडेगाव खुर्द येथून मोटारीने खांडवी ता. जळगाव जामोदकडे प्रयाण, त्यानंतर खांडवी येथे आगमन व भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या रिचार्ज शाफ्ट कामाची पाहणी, खांडवी येथून आसलगाव ता. जळगाव जामोदकडे जाणार असून, आसलगाव येथे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल कामाची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील विविध समस्या व मुद्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.