मुख्यमंत्री आज घेणार जिल्हा आढावा बैठक
By Admin | Updated: May 6, 2017 02:37 IST2017-05-06T02:37:08+5:302017-05-06T02:37:08+5:30
जलयुक्त शिवार अभियानातील विविध कामांची करणार पाहणी!

मुख्यमंत्री आज घेणार जिल्हा आढावा बैठक
बुलडाणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, पंतप्रधान आवास योजना आदी उपक्रमांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांची शनिवारी पाहणी करणार आहेत. तसेच जिल्हा आढावा बैठक घेणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचे सकाळी ८.३0 वाजता रामगिरी हेलिपॅड येथे आगमन होणार असून, हेलिकॉप्टरने जळगाव जामोद येथे जाणार आहेत. सकाळी ९.५0 वाजता गाडेगाव बु. येथे मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत घेतलेल्या शेततळ्याच्या कामाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी १0 वाजता गाडेगाव बु. येथून मोटारीने गाडेगाव खुर्द ता. जळगाव जामोदकडे प्रयाण, गाडेगाव खुर्द येथे आगमन व नाला खोलीकरण कामाची पाहणी, सकाळी १0.१५ वाजता गाडेगाव खुर्द येथून मोटारीने खांडवी ता. जळगाव जामोदकडे प्रयाण, त्यानंतर खांडवी येथे आगमन व भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या रिचार्ज शाफ्ट कामाची पाहणी, खांडवी येथून आसलगाव ता. जळगाव जामोदकडे जाणार असून, आसलगाव येथे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल कामाची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील विविध समस्या व मुद्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.