चित्ते गुरुजी यांची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:41 IST2021-02-17T04:41:28+5:302021-02-17T04:41:28+5:30

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देऊळगावराजा ते पिंपळगाव-चिलमखा रोडवर सखाराम श्रीपतराव चित्ते यांचे घर आहे. बऱ्याच दिवसांपासून शेजारी असलेल्या ...

Cheetah Guruji commits suicide by hanging | चित्ते गुरुजी यांची गळफास लावून आत्महत्या

चित्ते गुरुजी यांची गळफास लावून आत्महत्या

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देऊळगावराजा ते पिंपळगाव-चिलमखा रोडवर सखाराम श्रीपतराव चित्ते यांचे घर आहे. बऱ्याच दिवसांपासून शेजारी असलेल्या काही लोकांसोबत त्यांचा जमिनीचा वाद होता. या वादाचे पर्यवसान चित्ते गुरुजी यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरले. मंगळवारी सकाळी त्यांच्या घराजवळील गुलमोहराच्या झाडाला गळफास घेऊन सखाराम चित्ते यांनी आपली जीवनयात्रा संपवली. याबाबत कैलास शेषराव टाले यांनी दिलेल्या रीतसर फिर्यादीवरून देऊळगावराजा पोलिसांनी आरोपी प्रभाकर खंडागळे , रामदास खंडागळे, चंद्रभागाबाई खंडागळे, बबन खंडागळे, रा. देऊळगाव राजा तसेच गणेश आनंदराव जाधव रा. जालना यांच्या विराेधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोेने, नितीन जाधव, विजय किटे, विजू गीते आदी करीत आहेत.

Web Title: Cheetah Guruji commits suicide by hanging