स्वस्त धान्य दुकानदार चांडकविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:52 IST2017-09-18T00:50:59+5:302017-09-18T00:52:09+5:30
स्वस्त धान्य व केरोसीनच्या लाभार्थींंना वाटप न करता काळ्या बाजारात विक्री करून शासनाची फसवणूक केल्याने वाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार जयकुमार चांडक याच्याविरुद्ध १७ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

स्वस्त धान्य दुकानदार चांडकविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: स्वस्त धान्य व केरोसीनच्या लाभार्थींंना वाटप न करता काळ्या बाजारात विक्री करून शासनाची फसवणूक केल्याने वाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार जयकुमार चांडक याच्याविरुद्ध १७ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
येथील शहर पोलिसांनी १ सप्टेंबर रोजी वाडी येथे छापा मारला असता चांडक यांच्या मालकीच्या गोडावूनमध्ये शासकीय योजनेतील स्वस्त धान्य व रॉकेलचा साठा आढळला होता. याप्रकरणात चांडक कुटुंबातील चौघांवर कलम ३,७ जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला असून, विशाल चांडक यांना अटक झाली होती. तर जयकुमार चांडक हा फरार आहे. दरम्यान, पोलिसांच्या त पासात जयकुमार चांडक हा शासनाने निर्धारित केलेल्या कोट्यनुसार लाभार्थींना धान्य व केरोसीनचे वाटप करीत नाही. तसेच नियमित दरमहा वाटप करीत नाही. त्याचप्रमाणे रेशन कार्डवर खोट्या नोंदी करीत असल्याचे येथील रहिवाशांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले. तसेच घटनास्थळी आढळून आलेल्या चक्की व ग्रॅडर मशीनवर धान्याचे पीठ तयार करून किराणा दुकानदारांना विकत हो ता. याबाबतसुद्धा दोन तीन किराणा दुकानदारांनी जबाब दिला. यावरून पोलिसांनी गुन्हय़ात कलम ४२0, ४0६ व १८८ समाविष्ट केली.