स्वस्त धान्य दुकानदारांचा उद्यापासून संप
By Admin | Updated: July 31, 2014 01:26 IST2014-07-31T01:20:02+5:302014-07-31T01:26:59+5:30
खामगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने शुक्रवारपासून बेमुदत संप.

स्वस्त धान्य दुकानदारांचा उद्यापासून संप
खामगाव : तालुका स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेच्यावतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या १ ऑगस्ट शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.
शालेय पोषण आहार योजनेच्या प्रलंबित बिलांचा विचार व्हावा, ज्वारी बाकी असलेल्या दुकानदारांना त्वरीत ज्वारी मिळावी किंवा त्यांचे पैसे देण्यात यावे, वाढलेले २0 रूपये कमीशन देण्यात यावे, अन्नपुर्णा योजनेचे कमीशन व रिबीट मिळावे, साखर शासकीय गोदामातून वाटप करावी यासह इतर प्रलंबित मागण्याबाबत सदरचे आंदोलन करण्यात येत असल्याचे याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर रवि महाल्ले, रवि बोबडे, विजय घोगरे, दिलीप ताथेड, एस.बी. चव्हाण, प्रमोद बहूरूपी, राजेश चौधरी, विजय रायगावकर, गोपाल ठाकुर, अब्दुल करीम यासह इतरांच्या स्वाक्षर्या आहेत.