तलाठय़ास मारहाण
By Admin | Updated: August 2, 2014 23:47 IST2014-08-02T23:47:55+5:302014-08-02T23:47:55+5:30
तलाठी कार्यालयात काम करीत असतांना शिंदी येथील एका शेतकर्याने तलाठय़ास शिविगाळ करुन मारहाण केल्याची घटना घडली.

तलाठय़ास मारहाण
साखरखेर्डा : येथील तलाठी कार्यालयात काम करीत असतांना शिंदी येथील एका शेतकर्याने तलाठय़ास शिविगाळ करुन मारहाण केल्याची घटना घडली. साखरखेर्डा येथील तलाठी प्रशांत शंकरराव पोंधे हे शेतकर्यांना कागद पत्राची पुर्तता करीत असतांना शेतकरी भरत नवृत्ती बंगाळे कार्यालयात आला.
दरम्यान अगोदर माझे खरेदीची नोंद कर असे म्हणून, शिविगाळ करीत तलाठय़ास शेतकर्याने मारहाण केली आणि कागदपत्राची फेकाफेक केली. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी प्रशांत पोंधे यांनी साखरखेर्डा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन भरत बंगाळे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.